
अमजद खान
धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना कल्याणमध्ये घडली आहे. इथं कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थींनीशी बरोबर भयंकर प्रकार घडला आहे. या अल्पवयीन तरुणी बरोबर इंस्टाग्रामवर एका तरुणाने मैत्री केली. त्यानंतर तिच्या सोबत तिच्या सोबत शरिरसंबध प्रस्थापित केले. त्यावेळचा व्हिडीओ ही तयार करणयात आला. तो व्हिडीओ एका मित्राकडून दुसऱ्या, दुसऱ्याकडून तिसऱ्या आणि तिसऱ्याकडून चौथ्याकडे गेला. असं सात जणांकडे तो व्हिडीओ केला. या सात ही जणांनी नंतर या मुलीवर आळीपाळीने जवळपास पाच महिने अत्याचार केले. तिचे वेळोवेळी व्हिडीओ ही काढले. हे व्हिडीओ ज्यावेळी व्हायरल झाले त्यावेळी ते तिच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले. त्यानंतर हे सर्व बिंग फुटले.
कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थींनी तिच्या आईसोबत राहते. ती शिक्षण घेत आहे. तिची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून राहुल भोईर या तरुणाबरोबर झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. प्रेम झाल्यानंतर या तरुणाने संबंधीत तरुणी सोबत शरिर संबंध प्रस्थापित केले. त्याचा व्हिडीओ त्याने तयार केला. हे सर्व एप्रिल महिन्यात झाले. या मैत्रीतून त्याने तिला त्याच्या प्रेमाच्या जाळयात अडकविले होते. या मुलीवर तो लैगिंक अत्याचार करतच होता. त्याचा वेळोवेळी व्हीडीओ ही तयार करत होता. तो व्हिडिओ राहुलने त्याच दुसरा मित्र तरुण देवा पाटील याला पाठविला. देवा पाटील याने त्या मुलीशी संपर्क केला. शिवाय व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या बदल्यात त्याने ही तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.
त्यानंतर तर आणखी भयंकर घडले. हा व्हिडीओ पुढे अजित सुरवसे, गौरव सुरवसे, हर्षल पोळसे, जयेश मोरे आणि किरण सुरवसे यांना ही पाठवण्यात आला. त्यांनी ही त्या मुलीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या बदल्यात शरिर सुखाची मागणी करत या सर्वांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे सगळे आरोपी मुरबाड आणि भिवंडी परिसरात राहणारे आहे. शिवाय आरोपी धनाढ्य कुटंबातील आहे. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. या सातही आरोपींना कल्याणच्या पोक्सा विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सातही आरोपींना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नक्की वाचा - Dombivli News: पंतप्रधान मोदींवर टीका महागात पडली, काँग्रेस नेत्याला थेट साडी नेसवली
एक धक्कादायक बाबही यातून समोर आली आहे. या आत्याचारातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवतीही राहीली होती. सतत अत्याचार सुरू असल्यामुळे मुलगी पाच महिन्यापासून आधीच मानसिक तणावाखाली होती. जेव्हा तिला कुटुंबीय विचारत होते की काय झाले आहे, तेव्हा ती घरच्या मंडळींना काही एक सांगत नव्हती. पण तिचा व्हिडीओ इतका व्हायरल झाली की तो थेट तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर तिच्या घरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी थेट कल्याणच्या महात्मा फुले पोलीसात धाव घेतली. एप्रिल महिन्यापासून हे आत्याचार सुरू होते. गेली पाच महिने तिचे शोषण सुरू होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world