संसदेच्या परिसरात गुरुवारी 19 डिसेंबरला कथित धक्का-बुक्की प्रकरणात दोन खासदार जखमी झाल्यानंतर भाजपने काँग्रेस खासदार आणि लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि बासुरी स्वराज यांनी संसदेच्या स्ट्रीट पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेसचे खासदार राहुल गांधींविरोधात ओडिशातील बालासोरचे भाजप खासदार प्रताप सारंगी आणि उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील भाजप खासदार मुकेश राजपूत यांना धक्का दिल्या आरोप आहे. भाजप खासदारांनी त्यांच्याविरोधात सहा कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रत्युत्तरात काँग्रेस खासदारांनी तक्रार दाखल केली आहे.
नक्की वाचा - बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कुणी केला? अमित शाह यांनी 15 उदाहरणांनी काँग्रेसला दिलं उत्तर
राहुल गांधींविरोधात कोणत्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल?
भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि बासुरी स्वराज यांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राहुल गांधी यांच्यावर लावलेली कलमं कोणती?
कलम 109 : हत्येचा प्रयत्न करणे
कलम 117 : जाणून बुजून दुखापत पोहोचवणे
कलम 115 : दुखापत करण्याच्या उद्देशाने कृत्य करणे
कलम 3 (5) : सामुहिक पणे गुन्हा करणे
कलम 125 : खाजगी सुरक्षेला जोखीम मध्ये टाकणे
कलम 131 : धक्का देणे आणि भिती घालणे
कलम 351 : धमकी देणे
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी संसदेत निदर्शने केली होती. या निदर्शनावेळी भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळेच जखमी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.