कल्याण कोळसेवाडी परिसरातील तुरुंगात गेलेल्या मित्राच्या पत्नीसोबत तिचा मुलगा भांडतो म्हणून गुन्हेगार मित्राने मुलाचे अपहरण करत गोळीबार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू आहे.
कल्याणमधील बापगाव परिसरात आपल्या आई आणि दोन बहिणीसह राहणारा राहुल गंगे याचे वडील एक गुन्हेगार असून एका गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र जेलमध्ये गेल्यानंतर राहुल हा घरात कायमच आई-सह पत्नीला मारहाण करतो. रविवारी सकाळी राहुल याने आईला मारहाण केली ही माहिती त्यांच्यासोबत राहणाऱ्या राहुलच्या वडिलांच्या मित्राला मिळाली. मित्राच्या पत्नीला त्याच्या मुलाकडून त्रास होत असल्याचा राग मनात ठेवून वडिलांच्या गुन्हेगार मित्राने आईला मारहाण करणाऱ्या मुलाचे अपहरण करत मुरबाड येथील जंगलात नेलं.
नक्की वाचा - घरातल्या कुत्र्याच्या मृत्यूने धक्का; 12 वर्षांच्या मुलीने स्वत:चा जीवच संपवला!
तिथून कल्याण पूर्वेकडील होम बाबा टेकडी परिसरातील निर्जन स्थळी नेत त्याच्यावर गावठी पिस्तुलाने गोळीबार केला. मात्र त्या पिस्तूलामधून गोळी न निघता केवळ छर्रे निघत होते. हे छर्रे कमरेत लागल्याने राहुल गंभीर जखमी झाला आणि कसा बसा जीव वाचवत तो उपचारासाठी कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाला. याची माहिती पेट्रोलिंगच्या पोलिसांना मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत उपचार घेत असलेल्या राहुलची तक्रार घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे