अभिषेक भटपल्लीवार
विदर्भातल्या काही भागात आजही धुळवड खेळली जाते. धुळवड खेळल्यानंतर अनेक जण रंग काढण्यासाठी नदी किंवा तलावात जातात. चंद्रपूरातही धुळवड खेळल्यानंतर एकाच कुटुंबातील चार भावंड आपल्या मित्रांसह तलावात पोहण्यासाठी गेले होते. पण तलावात पोहायला जाण्याचा बेत त्यांच्या जीवावर बेतला. तलावात चार भावंडासह एका मित्राचाही बुडून मृत्यू झाला. तर एक मित्र पोहण्या ऐवजी काठावर बसला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. याघटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चार तरुण मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धुळवळीनंतर तलावात अंघोळीला जाण्याचा बेत सहा मित्रांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील घोडाझरी तलावात हे सर्व जण पोहण्यासाठी गेले. सहा जणा पैकी पाच जण पोहण्यासाठी तलावात उतरले. एक मित्र मात्र पोहण्यासाठी तलावात उतरला नाही. तो काठावरच बसून राहीला. त्याच वेळी पाच मित्र पाण्यात उतरले. पण त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आलाच नाही. त्यामुळे एकामागू एक पाच ही जणा त्या खोल पाण्यात बुडाले.
काठावर बसलेल्या मित्राच्या डोळ्या समोर हे सर्व जण बुडाले त्याने त्यांना वाचवण्यासाठी मदतीची हाक दिली. पण कुणीही मदतीला आले नाही. यात जनक गावंडे , यश गावंडे, अनिकेत गावंडे आणि तेजस गावंडे हे भाव भाव यात मृत्यूमुखी पडले. तर त्यांचा मित्र तेजस ठाकरे याचा ही पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत्यू पावले चार जण हे भाऊ आहेत. ते गावंडे परिवारातील आहेत. ते चिमूर तालुक्यातील साठगाव-कोलारी येथील राहाणारे आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. या दुःखद घटनेने जिल्हात शोककळा पसरली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध घोडाझरी तलावात पोहण्याचा आंनद घेण्यासाठी चिमूर तालुक्यात येणाऱ्या साठगाव-कोलारी गावातील पाच तरुण शनिवारी दुपारच्या सुमारास आले होते. जनक गावंडे,यश गावंडे,अनिकेत गावंडे,तेजस गावंडे, तेजस ठाकरे या पाच जीवलग मित्रांनी पोहण्यासाठी तलावात उडी घेतली. पण ही उडी त्यांची शेवटची ठरली.
पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मित्र बुडाले. घटनेची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बुडालेल्या पाच तरुणांचा शोध सुरु केला आहे. यासाठी स्थानिक मच्छीमारांची मदत पोलीस विभागाने घेतली. त्यानंतर पाचही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली आहे. शिवाय एकाच कुटुंबातील भावांचता यात जीव गेल्याने गावंडे कुटुंबावर तर दुख:चा डोंगर कोसळला आहे.