भाजपचे माजी आमदार दादाराव केचे यांचा नातू रुद्राक केचे याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की रुग्णालयात नेण्यापूर्वीच रुद्राकचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केचे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुद्राक अमरावतीवरुन आर्वीला आपल्या घरी जात होता. त्याचं घर अवघे सहा किलोमीटर दूर होतं. त्याचवेळी बैलगाडीला धडक बसली आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
नक्की वाचा - Kavita Badala Murder Case: चेन मार्केटींगचा नाद, आर्थिक फायद्यावरून वाद, 'सुटकेस मर्डर'चा पोलिसांनी छडा कसा लावला?
वर्ध्याच्या आर्वी विधानसभेचे माजी आमदार दादाराव केचे यांच्या नातवाचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. तळेगाव आर्वी रस्त्यावर रात्री हा अपघात झाला असून रुद्राक केचे असं मृतकाचे नाव आहे. तो आपल्या मित्रांसह आर्वी येथे घरी जात असताना अचानक बैलगाडी त्याच्यासमोर आडवी आली. त्याच दुचाकी जलग गतीने होती. त्यामुळे गाडीवर नियंत्रण करता आलं नाही आणि दुचाकी थेट बैलगाडीला धडकली. बैलगाडीला धडक बसल्याने तो दुचाकीवरुन वर उडाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.