Vasai News : वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवार यांना ED कडून अटक, 41 अनधिकृत इमारतींचं प्रकरण भोवलं

Former Vasai Virar Commissioner Anil Pawar arrested by ED : नालासोपारातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ED नं अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Anil Pawar : वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना अटक करण्यात आलीय.
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Former Vasai Virar Commissioner Anil Pawar arrested by ED : नालासोपारातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ED नं अटक केली आहे. मनी लाँड्रीग प्रकरणात ED नं ही कारवाई केली आहे. माजी आयुक्त अनिलकुमार पवार , बडतर्फ नगर रचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता यांना या प्रकरणात ED नं अटक केली आहे. अनिल पवार यांच्या घरावर काही दिवसांपूर्वीच ED नं छापा टाकाला होता. त्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण?

नालासोपारा येथील अग्रवाल नगरीतील डम्पिंग ग्राउंड आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (STP प्लांट) आरक्षित जागेवर बांधलेल्या 41 बेकायदा इमारती पाडण्याच्या घटनेनंतर, महापालिकेने त्या जागेवरील आरक्षण हटवले होते. महापालिकेनं हे नोटिफिकेशन काढले होते. नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांची या नोटिफिकेशनवर स्वाक्षरी होती. 

( नक्की वाचा : Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त! )
 

या कारवाईमुळे जवळपास 3000 कुटुंबे बाधित झाली होती, मात्र महापालिकेला जर संबंधित भूखंडावरील आरक्षण बदलायचे होते तर या कुटुंबांना बेघर का केलं ? हा प्रश्न विचारला जात होता. 

ज्या ठिकाणी आरक्षण होते त्या जागेवर अनधिकृत पणे बांधकाम करून ज्या 41 इमारती उभारल्या त्यामुळे डम्पिंग ग्राउंड आणि STP प्लांट न उभारल्यामुळे शहराच्या विकासाला बाधा येत होती. त्यामुळे सदर 41 इमारती तोडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने देखील कायम ठेवला आणि अखेर इमारती तोडल्या. 

Advertisement

मात्र आरक्षित भूखंडावरील अनधिकृत इमारती तोडून  भूखंड मोकळा करायचा आणि त्या ठिकाणाचे आरक्षण बदलून सदर भूखंड भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिकांना मोकळा करून द्यायचा, असं हे षडयंत्र असल्याचा आरोप होता. या कामासाठी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आला होता. यामध्ये भूमाफिया बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी यांची अभद्र युती असल्याचे दिसून येत होते. याबाबत अनेकांनी तक्रारी देखील केल्या होत्या. त्यातूनच ED  ने सुरुवातीला भू माफिया आणि तत्कालीन बहुजन विकास आघाडीचा नगरसेवक सिताराम गुप्ता यांच्यासह इतर बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली होती. 

या सर्व कारवाईदरम्यान झालेल्या तपासाचे धागेदोरे माजी महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या पर्यंत गेले होते. शिवाय त्यांच्या बदलीच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या फाइल्स क्लिअर केल्या इमारतींना सीसी दिल्या वेगवेगळ्या विभागातील कंत्राटदारांची बिले अदा केली. महत्त्वाचं म्हणजे 41 अनधिकृत इमारत प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी कुठेतरी अनिल कुमार पवार यांचे कनेक्शन येत असल्याने ED ने ही कारवाई केली आहे.

Advertisement