जाहिरात

Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त!

Vasai : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त!
Vasai News : .  याप्रकरणी लवकरच रेड्डी यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
वसई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली होती. हे प्रकरण अद्याप ताजं आहे. त्यानंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. आचोळे पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 13 (1)(ब) सह 13 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरी सापडला खजिना

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून करण्यात आली असून, तपासाअंती रेड्डी यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. याअंतर्गत ED (अंमलबजावणी संचालनालय) ने यापूर्वी वसईतील तसेच हैदराबाद येथील निवासस्थानी छापे टाकून तब्बल 23 कोटी 25 लाख 40 हजार रुपयांचे हिरे-जडजवाहीर आणि 8 कोटी 32 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली होती.

Latest and Breaking News on NDTV

Latest and Breaking News on NDTV

Latest and Breaking News on NDTV

तपासानुसार, रेड्डी यांनी वसई विरार महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली होती. त्यांच्याकडे आढळलेली संपत्ती ही त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अत्यंत जास्त असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

( नक्की वाचा : Nalasopara : ED च्या कारवाईत माजी आयुक्त कसे अडकले? काय आहे नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारीतींचं प्रकरण? )
 

ही संपत्ती मिळवताना त्यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, उपअधीक्षक दत्ताराम कराडे व तपासी अधिकारी रविंद्र परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तक्रारदाराच्या तक्रारीवरून आणि चौकशीअंती आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी लवकरच रेड्डी यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com