जाहिरात

पोहण्यासाठी पाण्यात उतरले, 'ते' चौघे जिवानिशी गेले, काय घडलं?

महाविद्यालयात शिकणाऱ्या पाच मित्रांनी शहरा जवळच्या झरी येथील तलावात पोहायला जाण्याचा बेत केला. पण पुढे भयंकर घडलं.

पोहण्यासाठी पाण्यात उतरले, 'ते' चौघे जिवानिशी गेले, काय घडलं?
नांदेड:

नांदेड शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. वातावरणात गारवा आहे. त्यामुळे महाविद्यालयात शिकणाऱ्या पाच मित्रांनी शहरा जवळच्या  झरी येथील तलावात पोहायला जाण्याचा बेत केला. पाचही जण तलावात गेले. एकमेकांचे फोटोही काढले. एकमेकांच्या सेल्फीही घेतल्या. त्यानंतर पाच पैकी चार जण तलावात पोहण्यासाठी उतरले. एक जण बाहेरच थांबला. पण पुढे या चारही मित्रां बरोबर भयंकर घडलं. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नांदेड शहरातील देगलूर नाका भागात शिकणारे शेख फजुल, काझी मुजम्मिल, अफान आणि सय्यद सिद्दीकी हे मित्र होते. सकाळपासून पावसाचे वातावरण होते. त्यामुळे या मित्रांनी शहरा बाहेर असलेल्या झरी तलावात पोहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. तलावाच्या इथलं वातावरण सुंदर होतं. त्यामुळे या सर्वांनाच इथे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. काहींनी बाहेर तर काहींनी पाण्यात उतरून फोटो काढले. पाच मित्रां पैकी चार जण पाण्यात उतरले. तर एकाने पाण्या बाहेर राहाणेच पसंत केले. तो बाहेरन त्यांचे फोटो काढत होता. 

ट्रेंडिंग बातमी - Sheikh Hasina शेख हसीनांना भारत मदत करणार की नाही ? परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले...

पाण्यात पोहता पोहता एका मित्राचा तोल गेला. तो खोल पाण्यात बुडू लागला. हे दुसऱ्या मित्राचे लक्षात आले. त्याला वाचवण्यासाठी त्याने मदतीचा हात दिला. पण तोही पाण्यात बूडू लागला. हे अन्य दोन मित्रांनी पाहीले. त्यांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने ते चौघेही बुडाले. आपले मित्र बुडत आहे हे पाहाणाऱ्या पाचव्या मित्राने तातडीने त्यांच्या नातेवाईकांना कळवले. परिवाराने ही क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना सविस्तर माहिती दिली. 

ट्रेंडिंग बातमी - Sheikh Hasina शेख हसीनांना भारत मदत करणार की नाही ? परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले...

घटनास्थळी पोलिसांचे बचाव पथक तात्काळ आले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या चारही मित्रांचा मृत्यू झाला होता. जीवरक्षक दल, अग्निशमन दल यांच्या मदतीने या चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी अग्निशमन दल, गोदावरी जीव रक्षक दल दाखल झाले होते. या घटनेनंतर त्या तलावा ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. मृतांच् कुटुंबीयही तिथे आले होते. त्यांनी आपल्या लेकरांना पाहून एकच हंबरडा फोडला. हे सर्व तरूण बारावीच्या वर्गात शिकत होते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com