मनिष रक्षमवार, गडचिरोली: कोरची तालुक्यातील बोडेना गावात गुरुवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले. अवघ्या 10 वर्षाची सोनाली आनंद नरेटी या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने टीव्हीवरील चॅनेल पाहण्याच्या किरकोळ वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोनाली हिने घरच्या मागील बाजूस असलेल्या पेरूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. तिची मोठी बहीण संध्या ( 12 वर्षे) हिच्यासोबत टीव्हीच्या रिमोटवरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात तिने हे टोकाचे पाऊस उचलले. "माझ आवडत चॅनल पाहू दिल नाही" हे आत्महत्येचे प्राथमिक कारण समोर आले आहे.
सोनाली संध्या व तिचा भाऊ सौरभ (8 वर्षे) हे तिघेही सध्या गोंदिया जिल्ह्यातील कोकना खोबा गावातील एका खासगी आश्रम शाळेत शिकत होते. उन्हाळी सुट्टीमुळे ते घरी आले होते. घरी आई मंगला आणि सर्वात लहान भाऊ शिवम राहात होते. यावेळी भावंडांमध्ये चॅनेल लावण्यावरुन वाद झाला. याच वादानंतर अवघ्या 12 वर्षाच्या सोनालीने आयुष्य संपवले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी घटना स्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेह कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून या प्रकाराने बालकांच्या मानसिकतेविषयी जागरूकतेची गरज अधोरेखित होत आहे. समाजाने अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी संवाद आणि संवेदनशीलतेची भूमिका स्विकारण्याची गरज आहे.
दुसरीकडे, हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगोली शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण केल्याची घटना घडली आहे, महावितरण चे तंत्रज्ञ सरोज खान पठाण हे लिंबाळा मक्ता भागातील 220 केव्हि उप केंद्राकडे जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या संदर्भात सर्वच खान पठाण यांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या वीस अनोळखी व्यक्तीविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तर घटनास्थळावरून पोलिसांनी दोन दुचाकी देखील जप्त केले आहे.
Badlapur News: बदलापूरकरांना मोठा दिलासा! पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार