जाहिरात

Gadchiroli News : गडचिरोलीत न्यायाधीश 4 दिवस प्यायले साप मेलेलं दूषित पाणी; प्रकृती बिघडली

तब्बल चार दिवस न्यायाधीश हे दूषित पाणी पित होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Gadchiroli News : गडचिरोलीत न्यायाधीश 4 दिवस प्यायले साप मेलेलं दूषित पाणी; प्रकृती बिघडली

सरन्यायाधीशांच्या प्रोटोकॉलचा मुद्दा देशभर गाजत असतानाच अहेरी तालुका मुख्यालयातही न्यायाधीशांना असुविधांचा सामना करावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिवाणी न्यायाधीश चार दिवसांपासून बोअरमधील साप मेलेले दूषित पाणी पित होते. दूषित पाणी प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अहेरी येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) शाहीद साजीदुजम्मा एम. एच. यांच्या अहेरी येथील शासकीय निवासस्थानातील बोअरवेल परिसरातून काहीतरी मेल्याची दुर्गंधी येत होती. सुरुवातील त्यांनी दुर्लक्ष केलं. मात्र, तीन दिवसांनंतर त्यांची प्रकृती बिघडली. ते रुग्णालयात भरती झाले. दूषित पाण्यातून त्यांना त्रास झाल्याचं लक्षात आल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.

Gadchiroli News : गडचिरोलीत मोठी कारवाई, माओवाद्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला, 5 जण ताब्यात

नक्की वाचा - Gadchiroli News : गडचिरोलीत मोठी कारवाई, माओवाद्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला, 5 जण ताब्यात

त्यानंतर न्यायाधीशांच्या घरामागील बोअरवेलची तपासणी करण्यात आली. यावेळी बोअरवेलमधून साप सडलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com