सरन्यायाधीशांच्या प्रोटोकॉलचा मुद्दा देशभर गाजत असतानाच अहेरी तालुका मुख्यालयातही न्यायाधीशांना असुविधांचा सामना करावा लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिवाणी न्यायाधीश चार दिवसांपासून बोअरमधील साप मेलेले दूषित पाणी पित होते. दूषित पाणी प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहेरी येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) शाहीद साजीदुजम्मा एम. एच. यांच्या अहेरी येथील शासकीय निवासस्थानातील बोअरवेल परिसरातून काहीतरी मेल्याची दुर्गंधी येत होती. सुरुवातील त्यांनी दुर्लक्ष केलं. मात्र, तीन दिवसांनंतर त्यांची प्रकृती बिघडली. ते रुग्णालयात भरती झाले. दूषित पाण्यातून त्यांना त्रास झाल्याचं लक्षात आल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.
नक्की वाचा - Gadchiroli News : गडचिरोलीत मोठी कारवाई, माओवाद्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला, 5 जण ताब्यात
त्यानंतर न्यायाधीशांच्या घरामागील बोअरवेलची तपासणी करण्यात आली. यावेळी बोअरवेलमधून साप सडलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.