मनिष रक्षमवार
नक्षलवाद्यां विरोधातली मोहीम ही अधिक तिव्र करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. भामरागड तालुक्यात कोपर्शीच्या जंगलात सुरू असलेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यात एक पुरुष आणि तीन महिला यांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी शस्त्रसाठा ही सापडला असून अजूनही चकमक सुरू आहे
गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांचे नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती. यावेळी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता.
प्रचंड पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी या जंगल परिसरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी शोध मोहीम राबवली. त्याच वेळी माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले. जवळपास आठ तास ही चकमक चालली. त्यानंतर शोध मोहिम राबवली गेली. त्यात 4 जहाल माओवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यात 1 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश होता.
याशिवाय घटनास्थळावरून 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल व 303 रायफल जप्त करण्यात आले आहेत. या भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवाद विरोधी अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलिसांना राहवलेलं हे अभियान यशस्वी झाले. शिवाय त्यांना मिळालेली गुप्त माहिती ही खरी ठरली. त्यामुळे चार जहाल नक्षलवाद्यांचा खात्म करण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे. दरम्यान या ठिकाणी अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.