Gadchiroli News: मुलानेच जन्मदात्या बापाला संपवलं! मृतदेह जंगलात फेकला अन्.. मित्राच्या मदतीने भयंकर कांड

जाहिरात
Read Time: 2 mins

गडचिरोली: गेल्या काही दिवसांपासून राज्यात भयंकर खूनाच्या, अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा, पोलीस प्रशासनाचा वचक राहिला आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये मुलाने आईची हत्या केल्याचे उघडकीस आले होते. ही घटना ताजी असतानाच आता गडचिरोलीमध्ये मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गडचिरोलीच्या चार्मोशी तालुक्यातील मार्कंडादेव येथे मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  रेवनाथ लक्ष्मण कोडापे (55, रा. मार्कंडादेव, ता. चामोर्शी) असे मृताचे नाव आहे. रेवनाथ यांची हत्या त्यांच्या मुलानेच केली असून वडिलांची हत्या करुन मुलाने मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकला. 

त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. 15 दिवसांनी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली, त्यामुळे भंडाफोड होण्याच्या भीतीने हादरलेल्या मुलाने चिचडोह बॅरेजमध्ये उडी घेतली मात्र, सुदैवाने तो वाचला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अखेर त्याने वडिलांच्या हत्येची कबुली दिली. याप्रकरणी मुलगा आकाश रेवनाथ कोडापे (29) व त्याचा मित्र लखन मडावी (25, रा. गडचिरोली) दोघांना अटक करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)

दुसरीकडे, अकोल्याच्या जुने शहरातील पोळा चौकात वैयक्तिक वादातून युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.  शुक्रवारी 2 मे मध्यरात्रीच्या दरम्यान सोनटके प्लॉट येथील शेख नाजीम शेख खालिक यांच्यावर हा वार झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

मागील ४ महिन्यांपासून भाऊ आणि मेहुणीपासून तो वेगळा राहत होता. दोन भाऊ व मेहुण्याने त्याला चहा पिण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले त्याच दरम्यान त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला... त्यामध्ये त्याच्या छातीवर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केली असून सध्या प्रकृती स्थिर आहे.

(नक्की वाचा- Jalgaon Politics : जळगावात शरद पवारांना मोठा धक्का; दोन शिलेदार अजित पवारांसोबत जाणार)