Crime news: गावगुंडाची दहशत! हातात कोयते घेवून दुकानात घुसले, दणादण तोडफोड अन्...

हे सर्व काही सीसीटीव्हीमध्ये कैद होत होते. पण त्याची कसलीही भिती त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

दिवसाढवळ्या दुकानावर हल्ला होतो. सर्वच पाहात राहात. दुकानात असलेले पळून जातात. पाहाता पाहात दुकानाची तोडफोड होते. सामान इकडच्या तिकडं होतं. फर्निचरचं मुकसान केलं जातं. काचा फोडल्या जातात. काही सेकंदात हा सर्व खेळ होतो आणि हे गावगुंड पसार होतात. ही धक्कादायक घटना घडली आहे नाशिकमध्ये. याचा घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल माडियावर जोरदार व्हायर होत आहे. हा हल्ला पाहात अंगावर काटा येतो. शिवाय नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा प्रश्नही निर्माण होतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिक पुणेरोडवर मेघराज बेकरी आहे. नेहमी प्रमाणे ही बेकरी उघडली होती. बेकरीत काही जण खेरीद करत होते. त्याच वेळी दोन गावगुंड या दुकानात घुसले. त्यावेळी त्यांच्या हातात तोयते होते. कुणाल काही समजण्या आत त्यांनी दुकानात तोडफोड सुरु केली. दुकानात एक महिला होती. तिने या दोघांच्या हातात कोयते पाहातच तिथून पळ काळला. त्यानंतर हे दोघेही बेधुंद पण तोडफोड करू लागले. बेकरीतल्या मालाचे नुकसान करु लागले. 

ट्रेंडिंग बातमी - वाहनांना HSRP नंबर प्लेट कधीपर्यंत बसवता येणार? मुदतवाढीबाबत परिवहन आयुक्तांचं मोठं वक्तव्य

हे सर्व काही सीसीटीव्हीमध्ये कैद होत होते. पण त्याची कसलीही भिती त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती. ते न भिता बेकरीची तोडफोड करत सुटले होते. जे लोक बेकरीत होते ते घाबरून पळून गेले. हा हल्ला दहशत माजवण्यासाठी त्यांनी केला होता. तोडडोफ केल्यानंतर तिथून त्यांनी पळ काळला. त्यावेळी बेकरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  

ट्रेंडिंग बातमी - Rane vs sena: देहविक्री करणाऱ्या महिलांना पकडले, त्याचे राणे कनेक्शन काय? राऊतांच्या आरोपाने खळबळ

त्यानंतर बेकरी मालकाने याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी दोन संशयितांना ताब्यत घेतले आहे. मात्र या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण आहे. गावगुंडांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या मुळे स्थानिक नागरिकही भयभित झाले आहेत. असचं सुरू राहीलं तर व्यापार करणं अवघड होईल असं ही त्यांनी सांगितलं. 

Advertisement