Gauri Garje Suicide: ते कागदपत्र,दुसऱ्या बाईचं नाव उघड..पंकजा मुंडेंच्या PAनं पत्नी गौरीलाच दिली सुसाइडची धमकी

Gauri Garje Suicide Case: गौरी गर्जे यांना कोणते कागदपत्र सापडलं होतं? अनंत गर्जेचं कोणते सत्य समोर आलं होतं? डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Gauri Garje Suicide Case : अनंत गर्जेनंच का दिली होती आत्महत्येची धमकी?"
Pankaja Munde X

- ऋतिक गणकवार, मुंबई प्रतिनिधी

Gauri Garje Suicide Case: डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीय. महाराष्ट्राच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेच्या पत्नी गौरी गर्जे यांनी शनिवारी (22 नोव्हेंबर 2025) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय. घरगुती वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. यादरम्यान गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात कागदपत्र आणि दुसऱ्या बाईच्या नावामुळे वेगळं वळण प्राप्त झालंय. 

ते कागदपत्र, दुसऱ्या महिलेचं नाव...पुढे काय घडलं?

सप्टेंबर महिन्यामध्ये अनंत गर्जे आणि गौरी गर्जे (Gauri Palve, Wife Of Anant Garje) यांनी राहतं घर बदललं होतं. त्यावेळेस गौरी यांना एक कागदपत्रं सापडलं होतं, ज्यामध्ये एका महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेचं नाव नमूद करण्यात आलं होतं. ही बाब गौरी यांनी त्यांच्या वडिलांनी सांगितली. यावरुन अनंतने गौरीला धमक्या देण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आलीय. तुझे आईवडील मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन आणि त्या चिठ्ठीमध्ये तुझं नाव लिहेन, अशी धमकी अनंत वारंवार गौरीला देत होता.  

गौरी गर्जे यांना मारहाण केली जात होती का?

गौरी गर्जे यांच्या शरीरावर अनेकदा मारहाण झाल्याचे व्रण पाहिल्याची माहिती त्यांच्या आईवडिलांनी दिलीय.  

(नक्की वाचा: Pankaja Munde PA: पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेचा पहिला फोन पंकजा मुंडेंना, चर्चा काय झाली?)

गौरी गर्जेने आत्महत्या केली हे अनंत गर्जेला कसं कळलं?

घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचा दरवाजा आतील बाजूने बंद होता, अशी प्रतिक्रिया अनंत गर्जेनं दिली. भीतीपोटी इमारतीच्या 31व्या मजल्यावरुन खिडकीच्या माध्यमातून मी 30व्या मजल्यावरील माझ्या घरात प्रवेश केला, तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, असे अनंत गर्जेनं (Pankaja Munde's PA Wife Committed Suicide) सांगितलं.

कोण होत्या डॉ. गौरी गर्जे?

गौरी गर्जे या मुंबईतील केईएम या सरकारी हॉस्पिटलमध्ये दंत चिकित्सा विभागामध्ये डॉक्टर होत्या. दहा महिन्यांपूर्वी गौरी गर्जे आणि अनंत गर्जे यांचं लग्न झालं होतं, त्यांच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ उडालीय.

Advertisement

(नक्की वाचा: Gauri Garje Suicide Case: वरळी हादरली! आत्महत्या करणाऱ्या डॉ. गौरी गर्जे कोण होत्या, का उचललं टोकाचं पाऊल?)