- ऋतिक गणकवार, मुंबई प्रतिनिधी
Gauri Garje Suicide Case: महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने कथित स्वरुपात घरगुती वादातून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलंय. गौरी पालवे-गर्जे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. गौरी यांनी मुंबईच्या वरळी परिसरातील राहत्या घरामध्ये गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी रविवारी (23 नोव्हेंबर 2025) दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेच्या पत्नी गौरी पालवे-गर्जे या शनिवारी (22 नोव्हेंबर 2025) संध्याकाळी वरळी परिसरातील निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या.
गौरी पालवे-गर्जे कोण होत्या? | Who Is Dr Gauri Palve Garje?
- गौरी पालवे-गर्जे यांनी केईएम या सरकारी हॉस्पिटलमधील दंत चिकित्सा विभागामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या.
- गौरी आणि अनंत यांचे 7 फेब्रुवारी 2025 रोजी लग्न बीड जिल्ह्यात झालं होतं.
- लग्न सोहळ्यामध्ये राज्यातील मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांसह मोठमोठ्या लोकांनी उपस्थिती दर्शवली होती.
गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या का केली? | Why Did Gauri Palve-Garje Commit Suicide?
अनंत गर्जेचे विवाहबाह्य संबंध असल्यानं गौरी अस्वस्थ होत्या, अशी माहिती समोर आलीय. याच तणावातून गौरीने आत्महत्या केल्याचे म्हटलं जातंय. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात पालवे कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असून लेकीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केलीय.
गौरी गर्जेने आत्महत्या केली त्यावेळेस अनंत गर्जे कुठे होता?
घटना घडली त्यावेळेस मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतील बाजूने बंद होते, अशी प्रतिक्रिया अनंत गर्जेनं दिलीय. घाबरुन इमारतीच्या 31व्या मजल्यावरुन खिडकीच्या माध्यमातून मी 30व्या मजल्यावरील माझ्या घरात प्रवेश केला, तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती, असे अनंत गर्जेनं सांगितलं.

Photo Credit: NDTV Marathi
...मुलीला समजावून सांगा, मग लगेचच आत्महत्या?अनंत गर्जेनं गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून सांगितलं होतं की, तुमची मुलगी आत्महत्या करतेय तिला समजावून सांगा. त्यावेळेस वडिलांनी गौरीकडे फोन द्या असं म्हटलं तर अनंत म्हणाला मी तिला दवाखान्यात घेऊन जातोय. पण लगेचच अनंत गर्जेनं गौरीच्या आईला फोन करुन त्यांच्या मुलीनं आत्महत्या केल्याचे सांगितलं. यानंतर पालवे कुटुंबीय तडक मुंबईकडे निघाले. गौरीच्या आईने 50 हून अधिक फोन केले पण अनंतनं एकाही फोनचं उत्तर दिलं नाही, अशी माहिती समोर आलीय.

Photo Credit: NDTV Marathi
एक कागद सापडला आणि मग सर्वच बदललंसप्टेंबर महिन्यामध्ये अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांनी राहतं घर बदललं, त्यावेळेस गौरीला कागदपत्र सापडलं, त्यामध्ये एका महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेच्या नावाचा उल्लेख होता. ही बाब गौरीने तिच्या वडिलांना सांगितली, पण तुझे आई-वडील जर मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन आणि चिठ्ठीमध्ये तुझ्या नावाचा उल्लेख करेन, अशी धमकी अनंत वारंवार गौरीला देत होता; अशीही धक्कादायक माहिती समोर आलीय.
(नक्की वाचा: Gauri Garje Death: एक कागद, संसारात वादळ.. डॉ. गौरीचा अमानुष छळ, पंकजा मुंडेंच्या पीएच्या प्रकरणात नवा ट्विस्ट)
गौरी यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण?गौरी यांच्या शरीरावर मारहाणीचे व्रण अनेकदा त्यांच्या आईवडिलांसह सहकाऱ्यांनीही पाहिल्याचीही माहिती समोर आलीय.
(नक्की वाचा: Pankaja Munde News: पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने संपवलं आयुष्य, 10 महिन्यापूर्वी झालेलं लग्न)
गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांची मोठी मागणीडॉ. गौरी पालवे यांची शवविच्छेदन चिकित्सा व्हिडीओग्राफी अंतर्गत व्हावी, अशी मागणी पालवे कुटुंबीयांनी केलीय. सर्व नातेवाईक नायर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील उपस्थित आहेत.
Wife of Maharashtra minister's PA dies by suicide; family alleges harassment
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world