वर्ध्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीत प्रवेश घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीने बाथरूमच्या अँगलला गळफास लावून आपला जीव संपवला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. वर्धा जिल्ह्यातील लोणसावळी येथून हा प्रकार उघडकीस आला आहे.
सोनिया उईके (17 वर्षे) असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती बारावीत प्रवेश घेण्यासाठी वडिलांकडून पैसे मागत होती. मात्र वडीत ते देत नसल्यामुळे विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं. मात्र वडिलांच्या हातात पैसे नव्हते पैसे आले की बारावीत प्रवेश घेऊन देऊ असं त्यांनी सोनियाला सांगितलं होतं. मात्र त्यापूर्वीच सोनियाने धक्कादायक पाऊल उचललं.
बातमी अपडेट होत आहे.