Former MLA Lavu Mamaldar : गोव्याचे माजी आमदार लवू ममलदार यांची एका किरकोळ कारणावरुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रिक्षा चालकासोबत ममलदार यांचा वाद झाला. यानंतर रिक्षा चालकाने त्यांना मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ममलदार यांच्या कारची एका रिक्षाला धडक लागली होती. ज्यानंतर रिक्षा चालक मुजाहिद सनदी याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर ममलदार आपल्या लॉजच्या पायऱ्या चढत होते. याचवेळी ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लवू मामलेदार हे 1981 नाशिक पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. यानंतर ते गोव्यात पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले आणि सुपरिटेंडेट पोलीस या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते निवडणुकीला उभे राहिले. आमदार म्हणून निवडूनही आले. सलग पाच वर्ष त्यांनी आमदार म्हणून काम केलं. काही कामानिमित्त ते बेळगावला आले होते आणि स्वतः गाडी चालवत असताना एका रिक्षाला चुकून किरकोळ धडक लागली. त्यासाठी त्यांनी रिक्षाचालकाची क्षमाही मागितली. मात्र रिक्षावाल्याने आणखी चार ते पाच रिक्षावाल्यांना गोळा केलं आणि त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. ते जिथे हॉटेलमध्ये राहत होते तिथे गाडीतून उतरल्याबरोबर या सगळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला अशी माहिती आहे.
या धक्क्यातच ते हॉटेलचा जिना चढले आणि रिसेप्शन काऊंटरसमोर येताच खाली कोसळले. येथेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1 ते 1.30 वाजता राहुल नावाची व्यक्ती आणि गोव्याचे माजी आमदार यांच्यात वाद झाला. यामध्ये एका रिक्षा चालकाचा समावेश होता. कारची रिक्षेला धडक बसली होती. ज्यामुळे हा वाद सुरू झाला होता. वादादरम्यान रिक्षा चालकाने माजी आमदाराच्या कानशिलात लगावली. यानंतर माजी आमदार लॉजच्या पायऱ्या चढत असताना ते खाली कोसळले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
नक्की वाचा - आरोपी अन् पोलिसांमध्ये तब्बल चार तास थरारनाट्य; मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी पोलीस दल हादरलं!
सोशल मीडियावरुन संताप
गोव्याचे माजी विधायक लवू ममलदार यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावरुन विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. पोलीस अधिकारी तुकडीचा एक अतिशय संवेदनशील आणि मनमिळावू पोलीस अधिकारी आणि गोव्याचे माजी आमदार , हकनाक प्राणास मुकले. या घटनेतील जबाबदार रिक्षाचालकांना काय शिक्षा देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.