Crime News : 760 ग्रॅम सोनं, 150 ग्रॅम हिरे, माणिक अन् पन्ना; दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात 1 कोटी कलशाची चोरी

लाल किल्ला परिसरातून अनुष्ठानादरम्यान एक कोटींचा कलश चोरी झाला आहे. या कलशावर सोनं-हिरे जडलेले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतीकात्मक तस्वीर
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • लाल किला परिसर में जैन धर्म के धार्मिक अनुष्ठान से लगभग एक करोड़ रुपये मूल्य का सोने का कलश चोरी हो गया है.
  • चोरी हुए कलश का वजन लगभग 760 ग्राम है और इसमें 150 ग्राम हीरे, माणिक्य तथा पन्ना जड़े हुए थे
  • लोकसभा अध्यक्ष ओम बिड़ला के कार्यक्रम के दौरान अफरातफरी में कलश मंच से चोरी हो गया.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

Gold Urn: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात (Delhi red fort Crime News) आयोजित जैन धर्माच्या धार्मिक अनुष्ठानातून एक कोटी रुपयांचा कलश चोरी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यावसायिक सुधीर जैन दररोज पूजा करण्यासाठी कलश घेऊन येत होते. गेल्या मंगळवारी कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही पोहोचले होते. स्वागताच्या गोंधळादरम्यान मंजावरुन कलश गायब झाला. 

पोलिसांनी कलश चोरी केलेल्या संशयित व्यक्तीची ओळख पटवली आहे. लवकरच या संशयिताला अटक करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. लाल किल्ला परिसरात जैन समुदायाचा हा अनुष्ठान 15 ऑगस्ट पार्कमध्ये सुरू असून 9 सप्टेंपर्यंत का कार्यक्रम चालेल. कलश चोरणारी व्यक्ती परिचित असल्याचं सांगितलं जात आहे. कलशाची किंमत एक कोटींच्या जवळपास असल्याचं त्याला माहीत होतं. अनुष्ठानाच्या ठिकाणाहून केवळ कलशचं चोरी झाला आहे. 

नक्की वाचा - Crime News: टीप मिळताच मुसक्या आवळल्या, कोळीवाड्यातून सायबर गुन्ह्यातील आरोपी अटकेत

लाल किल्ला परिसरातून अनुष्ठानदरम्यान चोरी झालेल्या कलशाची किंमत साधारण एक कोटींच्या जवळपास असल्याचं सांगितलं जात आहे. या कलशावर सोनं आणि हिरे जडलेले आहेत. या कलशाचं वजन साधारण ७६० ग्रॅम इतकं आहे आणि संपूर्ण सोन्याचा आहे. या कलशावर १५० ग्रॅम हिरे, माणिक आणि पन्नाही जडलेले आहेत. 

कलश चोरणाऱ्या संशयिताचा फोटो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलश चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनुष्ठान ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. यादरम्यान एका संशयास्पद व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. ही व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून धोती-कुर्ता घालून अनुष्ठान स्थळाच्या जवळपास फिरत होते. याने इथल्या लोकांसोबत ओळख वाढवली होती. त्यामुळे कोणालाच त्याच्यावर संशय आला नाही. ओम बिर्ला कार्यक्रम स्थिळी जाताच च्याने कलश चोरला. लवकरच या चोराला पकडण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 

Advertisement

जैन धर्मात कलश स्थापनेचं महत्त्व काय आहे? 

जैन धर्मात कलश स्थापनेचं खास महत्त्व आहे. कलशाच्या स्थापनेचा हेतू देवाचं आवाहन करणं आणि सकारात्मक- पवित्र ऊर्जेसाठी आहे. याला शुभ आणि शक्तिचं प्रतीक मानलं जातं. कलश स्थापित केल्याने पूजा आणि ध्यान अधिक फलदायी होते.
 

Topics mentioned in this article