
मुंबई: सायबर पोलीस ठाणे, मध्य विभागाच्या पथकाने ट्रॉम्बे कोळीवाड्यात छापा टाकून सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक केली आहे. दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी पोलीस हवालदार खर्जे आणि पोलीस शिपाई गदगे यांनी ट्रॉम्बे कोळीवाडा परिसरात पाळत ठेवली असता, आत्माराम निवास, दर्या दौलत हाऊसजवळ राहणारा शिवकुमार नायडू यास ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची एकूण ₹३७ लाखांची फसवणूक करण्यात आली असून त्यापैकी ₹६ लाखांची रक्कम आरोपीच्या Karur Vysya Bank मधील खात्यात जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडे चौकशी केल्यानंतर हे खाते त्याच्या नावानेच उघडण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हे खाते "Shri Mahalaxmi Enterprises" या नावाने चालवले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
दोघात तिसरा आला, जिवाला मुकला; तरुणाचा कोथळाच बाहेर.. भयंकर घटनेने महाराष्ट्र सुन्न
याप्रकरणी गु.र.क्र. 134/2025 नुसार भारतीय न्याय संहितेतील कलमे 318(4), 319(2), 336(2), 336(3), 338, 340(2), 3(5) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीच्या नावाने Karur Vysya Bank, State Bank of India व Canara Bank मध्ये विविध शाखांमध्ये खाते उघडण्यात आल्याचे आढळले आहे. ही खाती देखील सायबर फसवणुकीसाठी वापरली गेल्याची शक्यता आहे.
आरोपीच्या खात्यांबाबत 1930 पोर्टलवर तपास केल्यावर मुंबई, नवी मुंबई (नेरुळ), पुणे, जळगाव यासह दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि पंजाब या राज्यांमधील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचेही उघड झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी सांगितले की, आरोपीकडून इतर सहकारी आरोपींचा शोध घेण्यात येत असून या फसवणूक रॅकेटचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
भयंकर! आईनेच काळजाच्या तुकड्याला 12 व्या मजल्यावरुन फेकलं, नंतर स्वत:ही जीव दिला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world