गोलमाल! सोन्याचे दागिने काढून घेतले, वृद्ध महिलेच्या हाती दगड टेकवले

हातचलाखीने एका भामट्याने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. या भामट्याने या महिलेच्या वृद्धत्वाचा फायदा घेत तिच्या हातातले सोन्याचे दागिने लांबवीले.

Advertisement
Read Time: 2 mins
अकोला:

हातचलाखीने एका भामट्याने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. या भामट्याने या महिलेच्या वृद्धत्वाचा फायदा घेत तिच्या हातातले सोन्याचे दागिने लांबवीले. त्या बदल्यात त्याने त्या महिलेच्या हाती दगड दिले. हेच दगड घेऊन ती सराफाच्या दुकानात गेल्यानंतर आपण गंडवलो गेलो आहे हे तिच्या लक्षात आले.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अकोल्याच्या सराफा बाजारामध्ये खदान परिसरातील एक वृद्ध महिला आपले सोने गहाण ठेवण्यासाठी निघाली होती.  सराफा बाजारमध्ये जात असताना याची कुणकुण एका भामट्याला लागली. त्याने त्या महिलेचा पाठलाग केला. शेवटी त्याने तिला सराफा बाजारातचं गाठली. तिच्याशी तो गोडगोड बोलला. आपल्या बोलण्यात त्याने त्या महिलेला गुंतवले. शिवाय तिचा विश्वासही संपादीत केला. तिलाही त्याचा आधार वाटला. बोलता बोलता त्याने तिच्या हातातले सोन्याचे दागिने  कसे काढून घेतले हे तिला समजलेच नाही. तिने दागिने एका रूमालात बांधले होते. तसाच रूमाल त्याने त्या महिलेच्या हातात दिला. तोच रूमाल घेऊन ती पुढे सराफाकडे गेली. 

हेही वाचा - BREAKING : दाभोलकर हत्याकांडाचा निकाल समोर; पाचपैकी 2 दोषी, 3 निर्दोष

या वृद्ध महिलेला ते दागिने गहाण ठेवायचे होते. त्यामुळे ती पुढे सराफाकडे गेली. हातात असलेला रूमाल तिने सराफाला दिला. हे दागिने गहाण ठेवायचे आहेत. असं तीने सराफाला सांगितले. सराफाने दागिने पाहाण्यासाठी रूमाल खोलला. तर रूमालात सोन्या ऐवजी दगड दिसले. हे पाहून त्या महिलेला धक्काच बसला. आपली फसगत झाली आहे हे तिच्या लक्षात आले. तिने तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन गाठून हाकिकत सांगितली. त्यानंतर परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या महिलेला फसवणार भामटा कैद झाला होता. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

Advertisement