जाहिरात
Story ProgressBack

BREAKING : दाभोलकर हत्याकांडाचा निकाल समोर; पाचपैकी 2 दोषी, 3 निर्दोष

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाचा निकाल समोर आला आहे.

Read Time: 1 min
BREAKING : दाभोलकर हत्याकांडाचा निकाल समोर; पाचपैकी 2 दोषी, 3 निर्दोष
पुणे:

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाचा निकाल समोर आला आहे. गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यातील पाचपैकी दोन दोषींना जन्मठेप सुनावण्यात आली असून तिघांना निर्दोष करण्यात आले आहे. 

15 सप्टेंबर 2021 रोजी पुणे स्पेशन कोर्टाने दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित केला. डॉ. वीरेंद्र सिंह तावड़े, सचिन अंदुरे, शरद कालस्कर आणि विक्रम भावे याच्यावर  हत्या, हत्येचा कट रचणे आणि शस्त्रास्त्र कायद्याशी संबंधित कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. याशिवाय संजीव पुनालेकर याला पुरावे नष्ट करणे आणि चुकीची माहिती देण्यासाठी आयपीसी कलम 201 अंतर्गत आरोप करण्यात आले. 

नक्की वाचा - Explainer : दाभोलकर हत्याकांडाचा आज निकाल; गेल्या 11 वर्षात काय काय घडलं?

यापैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय विक्रम भावे, वीरेंद्र तावडे, संजीव पुनालेकर यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.  

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination