जाहिरात

स्मार्टफोनमुळे मुख्याध्यापकाने गमावला जीव, मोबाइलचा स्फोट का होतो? काय आहेत लक्षणं?

मोबाइल फोनमध्ये काही बिघाड झाल्यास त्याची लक्षणं दिसू लागतात त्याकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं.

स्मार्टफोनमुळे मुख्याध्यापकाने गमावला जीव, मोबाइलचा स्फोट का होतो? काय आहेत लक्षणं?
गोंदिया:

गोंदिया जिल्ह्यातील सिरेगाव येथे दुचाकीवरुन जाताना मोबाइल फोनचा स्फोट झाल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश संग्रामे व त्यांचा मित्र नत्थु गायकवाड दुचाकीवर जात होते. यावेळी सुरेश संग्रामे यांच्या खिशातील मोबाइल अचानक फुटला. स्फोट झाल्याने त्यांच्या कपड्यांना आग लागली. या आगीत शरीर भाजल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले सुरेश संग्रामे वाचू शकले नाही. या दुर्घटनेत त्यांच्या मागे बसलेले नत्थु गायकवाड गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे. 

Porsche Car Accident: मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या मुलाच्या पोर्शे कारने कित्येक बाइक्सचा केला चुराडा, घटना CCTVमध्ये कैद

नक्की वाचा - Porsche Car Accident: मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या मुलाच्या पोर्शे कारने कित्येक बाइक्सचा केला चुराडा, घटना CCTVमध्ये कैद

या दुर्घटनेमुळे मोठा विषयाला तोंड फुटलं आहे. आज बहुतांश व्यक्तीकडे स्वत:चा मोबाइल फोन असतो. त्यामुळे प्रत्येकाचा जीव धोक्यात आहे का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. सध्याच्या काळात स्मार्टफोन संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. आपली दिवसाची सुरुवात स्मार्टफोनमधील मेसेज पाहण्यापासून होते. तर रात्री बेडवर झोपतानासुद्धा फोन हातातच असतो. याच स्मार्टफोनच्या माध्यमातून केवळ फोन कॉल्स नाही तर मेसेज, व्हिडिओ पाठवणे, व्हिडिओ शूट करणे, फोटो क्लिक करणे इतकेच नाही तर आर्थिक व्यवहार सुद्धा करता येतात. त्यामुळेच स्मार्टफोन हा मनुष्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे. पण हा स्मार्टफोन वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा जीवावर बेतू शकते. 

मोबाइल स्फोटाची कारणं काय?
मोबाइलच्या बॅटरीमध्ये झालेल्या बिघाडातून स्फोट होण्याची शक्यता असते. लिथियम-आयन बॅटरी बऱ्याचदा मोबाइल फोनमध्ये वापरली जाते. या मोबाइल बॅटरीमध्ये एक सकारात्मक टर्मिनल, एक नकारात्मक टर्मिनल (कॅथोड आणि अनोड ) आणि एक इलेक्ट्रोलाइट असते. बॅटरीममध्ये काही खराबी आल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकतो. ज्यामुळे आयर्न थेट कॅथोड आणि अॅनोडदरम्यान जाते. त्यामुळे बॅटरीच्या आतील तापमान आणि दाब वाढतो. ज्यामुळे स्फोट होऊ शकतो.

ही चूक कोणीही करू नका; क्रिकेटच्या सरावाला जात असताना 21 वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू

नक्की वाचा - ​​​​​​​ही चूक कोणीही करू नका; क्रिकेटच्या सरावाला जात असताना 21 वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू

स्मार्टफोनमध्ये स्फोट होण्याआधी दिसणारी लक्षणे?
1) तुमच्या फोनची बॅटरी फुगलेली दिसत असेल तर, बॅटरी खराब झाल्याची शक्यता असून ती लवकरात लवकर बदलून घ्यावी.
2) चार्जिंग करताना तुमचा फोन प्रमाणापेक्षा जास्त गरम झाला तर फोनमधील बॅटरी खराब झाली आहे आणि शक्य तितक्या लवकर फोनमध्ये बॅटरी बदलून घ्यावी.
3) जर तुम्हाला फोनमधून विविध प्रकारचे आवाज ऐकू येत असतील तर बॅटरीमध्ये बिघाड झाल्याची शक्यता आहे. बॅटरीतून गॅसगळती झाल्याने असं होऊ शकतं.
4) जर तुमचा फोन अनपेक्षितपणे बंद होत असेल आणि विशेषत: जर असं वारंवार होत असेल तर बॅटरी डेड झाल्याचं लक्षण असू शकतं.
5) जर आपल्या स्मार्टफोनमधून काहीतरी जळत असल्याचा वास येत असेल तर फोन तातडीने तपासून घेणं केव्हाही चांगलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com