Porsche Car Accident CCTV Video: मुंबईतील पोर्शे कार अपघाताचा एका व्हिडिओ समोर आला आहे. वांद्रे परिसरात एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा शनिवारी पहाटे 2.40 वाजता निष्काळजीपणे पोर्शे कार चालवित होता. यावेळी त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक दुचाकींना धडक दिली. या घटनेचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा - ही चूक कोणीही करू नका; क्रिकेटच्या सरावाला जात असताना 21 वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू
हा अपघात साधु वासवानी चौकाजवळ घडला. येथे रस्त्याच्या कडेला अनेक दुचाकी उभ्या होत्या. यावेळी जलद गतीने येणाऱ्या पोर्शे कारने त्या दुचाकींना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणही जखमी झालेला नाही. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून पाच जणं प्रवास करीत होते. ज्यात चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. या घटनेत 18 वर्षीय तरुणाचा रक्ताचा नमुना घेण्यात आला आहे. जे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल की, ड्रायव्हर निष्काळजीपणा कार चालवित होता की तो नशेत होता.
यापूर्वी मुंबईतील वांद्रे भागातील हिट अँड रन प्रकरणात 25 वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाला आहे. येथे एका टँकरने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातानंतर टँकर चालक वाहन सोडून पळून गेला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्याच्या हिट अँड रनमध्ये दोघांचा मृत्यू..
यापूर्वी पुण्यात एका बिल्डरचा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत गाडी चालवित होता. भरधाव वेगाने गाडी चालविताना त्याने दुचाकीला धडक दिली, यात एक तरुणी आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world