Dombivli News: गावदेवीच्या जत्रेसाठी बकरा दिला नाही..अख्ख्या कुटुंबाला मारहाण, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

जत्रेसाठी बकरा दिला नाही म्हणून एका कुटुंबातील तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli Gaondevi Jatra Crime News
मुंबई:

Dombivali Crime News Today :  जत्रेसाठी बकरा दिला नाही म्हणून एका कुटुंबातील तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत घडली. हल्लेखोर रिक्षा आणि चारचाकी वाहनातून आले होते. त्यानंतर त्यांनी  आशिष विठ्ठल दळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात आशिषची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी 7  जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड क्राईम स्टोरी..

याबाबत सविस्तर वृत्त असं की, डोंबिवलीत गावदेवीची जत्रा सुरु आहे.कुंभारखान परिसरात आशिष विठ्ठल दळवी यांचा तबेला आहे. या तबेल्यात बकरी आणि म्हशी आहेत.परिसरात जत्रा सुरु असल्याने नागरिकांनी उत्साहात जत्रा साजरी केली. मात्र रात्री अडीच वाजताच्या सुमारास आशिष दळवी यांच्या तबेल्यात सुजल भोसले नावाचा तरुण आला.

Advertisement

नक्की वाचा >> Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं टेन्शन वाढलं, पोलिसांनी पुण्याच्या पत्त्यावर धाडली 'ही' नोटीस

"आईला सांगून ठेवतो, तुम्ही बकरा घेऊन जा"

त्याने आशिषला सांगितले की,'मला बकरा दे'.त्यानंतर आशिष म्हणाला, 'ठीक आहे, उद्या सकाळी या.आईला सांगून ठेवतो.तुम्ही बकरा घेऊन जा.'या गोष्टीचा सुजलला राग आला. काही वेळात सुजल भोसले हा त्याचा मित्र विनय हेगडे,प्रमोद ठाकरे,यज्ञेश खंडागळे,अक्षय खंडागळे आणि अन्य दोन साथिदारांसोबत तिथे आला आणि आशिषला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत आशिषची आई आणि मोठा भाऊ देखील जखमी झाले आहेत. या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

नक्की वाचा >> Solapur News: सोलापुरात संतापाची लाट! खोट्या HIV अहवालामुळे गर्भवतीचा संसार उद्ध्वस्त, सासरच्या लोकांनी..