सुनील दवंगे, प्रतिनिधी
Pratibha Chakankar Latest News : भोंदू अशोक खरातचं समता पतसंस्थेतील कनेक्शनच गुढ आता अधिकच वाढत चाललंय. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाचे चार खाते आहेत. त्यांच्या खात्यातून तब्बल दोन कोटी चाळीस लाखांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या रक्कमेची आणि खात्या संबंधीत चौकशी शिर्डी पोलिसांकडून केला जाणार आहे.याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या पुण्याच्या पत्त्यावर नोटीस पाठवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अशोक खरातने समता पतसंस्थेत उघडलेल्या शंभर खात्यांची चौकशी शिर्डी पोलिसांकडून सुरु आहे.यातील 57 खातेदारांपैकी 33 जणांची चौकशी पूर्ण झाली असून आता प्रतिभा चाकणकरांच्या पुण्याच्या पत्त्यावर नोटीस रवाना करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> Solapur News: सोलापुरात संतापाची लाट! खोट्या HIV अहवालामुळे गर्भवतीचा संसार उद्ध्वस्त, सासरच्या लोकांनी..
शिर्डी डाक विभागाने दोन्ही पत्त्यावर पाठवली नोटीस
प्रतिभा गणेश चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या अशा दोन्ही पत्त्यावर भारतीय डाक विभागाच्या नोंदणीकृत टपालानं ही नोटीस पाठवण्यात आली असून सात दिवसांत याबाबतची माहिती चाकणकर यांनी पोलीसांना द्यायचे आहे. ही नोटीस शिर्डी डाक विभागकडून आज पाठवण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात ही नोटीस चाकणकरांच्या घरी पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world