Mumbai News : वाढदिवसानिमित्त फुगे नेताना भयंकर घडलं, लिफ्टमध्येच स्फोट; CCTV Video आला समोर

इमारतीतील वाढदिवसानिमित्त फुगे आणण्यात आले होते. हे फुगे लिफ्टमधून घेऊन जात असताना हा स्फोट झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर इमारतीत लिफ्टमधून हायड्रोजन गॅस भरलेले फुगे नेले जात असल्याचा धोकादायक प्रकार समोर आला आहे. हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने लिफ्टसारख्या बंद जागेत आग किंवा स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. 

नेमकं काय घडलं? 

गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर इमारतीत लिफ्टमधून हायड्रोजन गॅस भरलेले फुगे नेले जात असल्याचा धोकादायक प्रकार समोर आला आहे. हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने लिफ्टसारख्या बंद जागेत आग किंवा स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. 

नक्की वाचा - Mumbai Pune Expressway वर 22 तासांपासून खोळंबा; नेमकं काय घडलंय? गळती झालेला वायु किती धोकादायक?


मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीतील वाढदिवसानिमित्त फुगे आणण्यात आले होते. हे फुगे लिफ्टमधून घेऊन जात असताना हा स्फोट झाला. त्यावेळी लिफ्टमध्ये एक तरुण आणि दोन मुलं होतं. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, हायड्रोजन गॅसचे फुगे लिफ्टमध्ये नेताचा मोठा स्फोट झाला. या अपघातात तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. स्फोट होता तिघेही तातडीने बाहेर पडले. हा स्फोट सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.  या प्रकरणी गॅस फुगे विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्फोट कशामुळे आणि का झाला हे अद्याप कळू शकलेलंल नाही. 

नागरिकांनी व सोसायटी प्रशासनाने तत्काळ सतर्क राहावे व अशा प्रकारांना आळा घालावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article