ज्या हाताला धरून चालायला शिकवले, त्याच हातांनी आजी-आजोबांना संपवले, नातवाच्या कृत्याने वाशिम हादरले

आजी- आजोबांचा खून करण्या मागचे कारण पाहीले तर ते अधिक धक्कादायक आहे. या प्रकरणी पोलिसांनी नातवासह त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाशिम:

वाशिमध्ये सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. ज्या नातवावर म्हातारपणी आजी आजोबांना आधार देण्याची जबाबदारी असते, त्याच नातवाने त्यांना स्वत:च्या हाताने संपवलं. हे कृत्य करताना त्याला कोणताही पश्चाताप झाला नाही. किंवा हे कृत्य करताना त्याचे हातही थरथरले नाहीत. आजी- आजोबांचा खून करण्या मागचे कारण पाहीले तर ते अधिक धक्कादायक आहे. या प्रकरणी पोलिसांनी नातवासह त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाजी समोर आल्या आहेत. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वाशिमच्या मानोरा येथे प्रल्हाद वीर आणि त्यांची पत्नी निर्मला वीर हे वृद्ध दाम्पत्य राहते. यातील प्रल्हाद वीर यांचा मृतदेह पोलिसांना इंढोरी इथल्या अडाण धरणात तरंगताना दिसून आला. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला. चौकशी करून ते त्यांच्या घरी पोहोचले. मात्र घरी काही सुरळीत नव्हतं. पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्यांना घरात रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे काही तरी भयंकर घडल्याचा अंदाज पोलिसांना आला. पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली. 

ट्रेंडिंग बातमी - 'लोकसभेला झालं गेलं गंगेला मिळालं, आता...' दादांचा वादा अन् आवाहनही

चौकशी दरम्यान घरातून प्रल्हाद यांच्या पत्नी निर्मला गायब असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. वीर दाम्पत्याच्या घरा समोर सीसीटीव्ही कॅमेरा होता. त्याचे फुटेज पोलिसांनी मिळवले. त्यात वीर यांचा नातू प्रतिक वीर त्याच्या तीन साथिदारांसह दिसला. पोलिसांनी या चौघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत  प्रतिकने आजोबांसह आजीचा खून केल्याचे सांगितले. आजोबांना आधी धारधार शस्त्राने मारले. त्यानंतर आजीचा गळा दाबून खून केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह अडाण धरणात फेकून देण्यात आले. पोलिसांनी आजीच्या मृतदेहाचाही शोध घेत तो ताब्यात घेतला आहे.

ट्रेंडिंग बातमी - पवार विरहीत राजकारणाचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न ? दूरदृष्टी ठेवत दिल्ली दौऱ्याची आखणी

रविवार 4 ऑगस्ट 2024 नातू प्रतिक याचा आजी आणि आजोबां बरोबर वाद झाला होता. कार आणि संतत्ती वरून हा वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात नातवाने आजी आणि आजोबांना मारण्याचा कट मित्रांच्या सहाय्याने रचला. त्यात तो यशस्वी झाला. ज्या कार वरून वाद झाला ती कारनंतर प्रतिकने जालना जिल्ह्यातल्या भोकरदन येथे मित्राच्या घरी लपवली होती. खून केल्यानंतर तो फरार झाला होता. चार दिवसापासून तो वेगवेगळ्या गावात फिरत होता. शेवटी त्याला पोलिसांनी सायखेडा येथुन ताब्यात घेतले.  

Advertisement

हे ही वाचा: ठाकरेंनी दिल्लीत डाव टाकला, मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान

या खून प्रकरणात  नातू प्रतीक संतोष वीर, त्याला मदत करणारे विकास भगत,जगदीश  देवकर,आणि जीवन फडके अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. संपत्तीच्या वादातून हे दुहेरी खून झाला आहे. प्रकरणाचा पुढील तपास LCB निरीक्षक रामकृष्ण महल्ले, मानोरा ठाणेदार प्रवीण शिंदे,तसेच मयुरेश तिवारी यांच्यासह पोलीस करत आहेत.