Gujarat News : पत्नी प्रियकरासोबत गेली पळून, संतापलेल्या पतीने बुलडोझर घेतलं भाड्याने अन् थेट...हैराण करणारं प्रकरणं

गुजरातमध्ये वैयक्तिक वैमनस्यातून बुलडोझरचा वापर केला जात असल्याने चिंता वाढली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Gujarat News : रस्त्यावरुन एखादा बुलडोझर पाहिला तर कोणत्या तरी भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी जात असेल असाच विचार येतो. देशभरात बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर अॅक्शन घेतली जाते. मात्र गुजरातमध्ये बुलडोझर अॅक्शनचा असा प्रकार समोर आला आहे जो पाहून कोणीही हैराण होईल. गुजरातमधील एका कुटुंबाने सूड उगवण्यासाठी बुलडोझर भाड्याने घेतल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातून दोष सिद्ध होण्यापूर्वीच आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवला जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. इतर राज्यांमध्येही हिच प्रथा सुरू झाली असताना आता वैयक्तिक कारणामुळे बुलडोझरचा वापर केला जात असल्याने चिंता वाढली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुजरातमधील भरूच जिल्ह्यात एक विवाहित महिला आपला प्रियकर महेश फुलमालीसोबत पळून गेली. महिला घरातून पळून गेल्यानंतर संतापलेल्या कुटुंबाने त्या मुलाचं घर उद्ध्वस्त करण्याचा निर्णय गेतला. मग काय महिलेच्या कुटुंबाने बुलडोझर भाड्याने घेऊन महेश फुलमाली आणि त्याच्या सहा नातेवाईकांच्या घराचा काही भाग उद्ध्वस्त केला. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फुलमालीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून बुलडोझर जप्त केलं आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - kunal kamra : 'गद्दार नजर वो आए...', कॉमेडियन कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर गाणं, भडकलेल्या शिवसैनिकांकडून तोडफोड

मुलाच्या बहिणीच्या कानशिलात लगावली...
महिला आनंद जिल्ह्याच्या अंकलाव तालुक्यात आपल्या आई-वडिलांना भेटायला गेली होती. त्यापूर्वी फुलमाली आपल्या प्रेयसीसोबत पळून गेला होता. फुलमालीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती आणि त्याचे नातेवाईक आमच्या घरी आले आणि कुटुंबाला धमकी दिली. त्याने फुलमालीच्या कुटुंबाला चुकीची वागणूक दिली आणि त्याच्या बहिणीला कानशिलात लगावली. 

Advertisement

सूड उगवण्यासाठी बुलडोझरची मदत...
उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालविण्याची प्रथा सुरू आहे. अनेक राज्यांमध्येही अशी पद्धत सुरू झाल्याचं दिसतं. कोणत्याही प्रकरणात दोषी सिद्ध होण्यापूर्वीच आरोपींचं घर उद्ध्वस्त केलं जातं. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यभरातील गुन्हेगारांच्या 'बेकायदेशीर' मालमत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जात आहे. त्यातच आता भरूच जिल्ह्यातील एका कुटुंबाने वैयक्तिक वैमनस्यातून घेतलेला मार्ग हा चिंतेचा विषय आहे. 
 

Topics mentioned in this article