
Stand-up comedian Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आपल्या कार्यक्रमादरम्यान एक विडंबनात्मक गाणं सादर केली. त्याने आपल्या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका करीत एकनाथ शिंदेंवर कडक निशाणा साधला. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी कुणालच्या सेटवर तोडफोड केली आहे. याशिवाय त्याच्याविरोधात कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराच्या गाण्याचा व्हिडिओ ट्विट केलं आहे आणि कुणालची कमाल म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुणालने तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातील घटनाक्रमावर टिप्पणी करीत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. दुसरीकडे शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत कुणाल कामराचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणच्या स्टुडिओची तोडफोड केली. या वादग्रस्त व्हिडिओमध्ये त्याने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लवकरच या प्रकरणात एफआयआर दाखल होऊ शकते.
नक्की वाचा - Shivsena news: शिंदेंचे शिलेदार एकमेकानाच भिडले, भर रस्त्यात राडा, कल्याणमध्ये नेमकं काय झालं?
कुणाल कामरा काय म्हणाला?
कुणाल कामरा म्हणाला, शिवसेना भाजपमधून बाहेर आली. त्यानंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. त्यानंतर एनसीपी एनसीपीमधून बाहेर पडली. एका मतदाराला नऊ बटणं देण्यात आली. त्यामुळे मतदारही हैराण झाला.
कुणाल कामराच्या कवितेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या गाण्यातून एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे अशा अपमानास्पद गोष्टींविरोधात कारवाई केली जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world