जाहिरात

ISI Spy : आणखी किती गद्दार? 40 हजारांच्या बदल्यात इमान विकणाऱ्या हेराला अटक, वाचा कसा सापडला जाळ्यात?

ISI Spy Arrested: पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारतामध्ये दडलेले पाकिस्तानी गुप्तहेर सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात सापडत आहे.

ISI Spy : आणखी किती गद्दार? 40 हजारांच्या बदल्यात इमान विकणाऱ्या हेराला अटक, वाचा कसा सापडला जाळ्यात?
मुंबई:

ISI Spy Arrested: पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारतामध्ये दडलेले पाकिस्तानी गुप्तहेर सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात सापडत आहे. गुजरातमध्ये एका व्यक्तीला भारतीय वायुसेना (IAF) आणि सीमा सुरक्षा दल (BSF) संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानी एजंटसोबत शेअर केल्याच्या आरोपाखाली शनिवारी (24 मे) अटक करण्यात आली आहे. आरोपी सहदेव सिंह गोहिल असं या आरोपीचं नाव आहे. तो कच्छमध्ये आरोग्य कर्मचारी म्हणून काम करतो, अशी माहिती गुजरात दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) वरिष्ठ अधिकारी के. सिद्धार्थ यांनी दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गोहिल 2023 साली व्हॉट्सॲपद्वारे एका 28 वर्षीय पाकिस्तानी महिला एजंटच्या संपर्कात आला. या महिलेने गोहिलसमोर स्वतःला अदिती भारद्वाज असे सांगितले होते. गोहिलनं या महिलेला भारतीय वायुसेना आणि बीएसएफच्या नवीन किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले, अशी माहिती सिद्धार्थ यांनी दिली.  

कसा जाळ्यात सापडला?

सिद्धार्थ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 'आम्हाला माहिती मिळाली होती की तो बीएसएफ आणि आयएएफशी संबंधित माहिती एका पाकिस्तानी एजंटसोबत शेअर करत होता. त्यानंतर 1 मे रोजी गोहिलला प्राथमिक चौकशीसाठी बोलावण्यात आले, त्यावेळी एसटीएफला कळले की, पाकिस्तानी एजंटने त्याच्याकडून आयएएफ आणि बीएसएफच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ मागवले होते.

( नक्की वाचा : Spy Racket : पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली आणि हेर बनली! ISI एजंट महिला YouTuber सह 6 जणांना अटक )
 

2025 च्या सुरुवातीला गोहिलने आपल्या आधार कार्डवर एक सिम कार्ड खरेदी केले आणि ओटीपी (वन टाइम पासवर्ड) च्या मदतीने अदिती भारद्वाजसाठी त्या नंबरवर व्हॉट्सॲप सक्रिय केले. यानंतर बीएसएफ आणि आयएएफशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडिओ त्या नंबरवर शेअर करण्यात आले. गोहिलने माहिती शेअर करण्यासाठी वापरलेले नंबर पाकिस्तानातून चालवले जात होते, असं फॉरेन्सिक तपासणीत  स्पष्ट झालं आहे.

40 हजारांसाठी सौदा 

गोहिलला एका अज्ञात व्यक्तीने 40,000 रुपये रोख दिले होते, अशी माहिती सिद्धार्थ यांनी दिली. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी गेल्या काही दिवसांमध्ये हेरगिरीच्या संशयाखाली आत्तापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये एक यूट्यूबर, एक व्यावसायिक आणि एक सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com