तो गुजराती, ती चीनी दोघांनी मिळून केलं मोठं कांड, संपूर्ण अमेरिकेत खळबळ!

गुजरातमधील एका व्यक्तीनं त्याच्या चीनी सहकाऱ्यासोबत केलेल्या कृतीनं संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

गुजरातमधील एका व्यक्तीनं त्याच्या चीनी सहकाऱ्यासोबत केलेल्या कृतीनं संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. या जोडीनं अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिक दाम्पत्यांना लक्ष्य केलं. अमेरिकन जोडप्याची आयुष्यभराची संपत्ती असलेलं 12 कोटींच्या संपत्तीचं सोन्यामध्ये रुपांतर करुन ते लुबाडल्याच्या आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांची सध्या चौकशी सुरु आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

गुजरातचा हमरिश पटेल आणि चीनची वेनहुई सन असं या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. त्यांना होमलँड सिक्युरिटी इन्वेस्टिगेशनच्या (HSI) अधिकाऱ्यांनी जवळपास 1.4 मिलियन डॉलरच्या फसवणूक प्रकरणात अटक केलीय. 

25 वर्षांच्या पटेलला न्यूयॉर्कमधील ट्रोयमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याची 1 मिलियन चोरल्याच्या  प्रकरणात 29 जुलै रोजी अटक करण्यात आलीय. तर वेनहूई सनवर मेरीलँडमधील जोडप्याची 331,817 डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या दोन्ही प्रकरणात समानता असल्याचं एचआसआयच्या तपासात आढळलं. त्याचबरोबर त्यांच्यामधील कनेक्शनचाही तपास यंत्रणांनी शोध लावलाय. 

( नक्की वाचा : भारतात क्रिप्टो करन्सीची सर्वात मोठी चोरी, 2000 हजार कोटींचे क्रिप्टो लंपास )
 

कशी केली फसवणूक?

'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या रिपोर्टनुसार ट्रोयमधील राहणाऱ्या जोडप्याला पेपालच्या माध्यमातून एक कथित मेल गेला होता. त्यामध्ये तुमच्या अकाऊंटमधील 465.88 डॉलर्स पुढच्या 24 तासांमध्ये कट करण्यात येतील, असं लिहिलं होतं. या मेलमध्ये कस्टमर सपोर्टचे नंबर दिले होते. तिथं फोन केल्यानंतर तुम्हाला हा व्यवहार थांबवता येईल, असा दावा या मेलमध्ये करण्यात आला होता. 

या जोडप्यानं कस्टमर केअरला फोन केल्यानंतर गॅनन नावाच्या व्यक्तीनं कस्टमर सपोर्टला फोन करुन एलिजाबेथ श्नेइरोव या महिलेचा त्यांना नंबर दिला. ही महिला फेडरल ट्रेड कमिशनमध्ये सहाय्यक संचालक असल्याचं या जोडप्याला सांगण्यात आलं. त्यानंतर एलिजाबेथच्या सल्ल्यानुसार या दाम्पत्यानं 5 डिसेंबर 2023 रोजी चीनमधील डिंगक्सी ट्रेड लिमिटेडबरोबर 102,000 डॉलरचा ऑनलाईन व्यवहार केला.  

Advertisement

एलिजाबेथनं 7 डिसेंबर रोजी या जोडप्याला फोन करुन तुमची सर्व शिल्लक रक्कम सोन्यामध्ये रुपांतरित करण्यात आली असून ती ट्रेजरी विभागाच्या लॉकरमध्ये सुरक्षित असल्याचं सांगितलं. या कॉलनंतर जानेवारी 2024 पर्यंत या जोडप्यानं 1 मिलियन डॉलर रकमेचे तीन गोल्ड बुलियन खरेदी केले. 

इलिनोइसमधील स्ट्रीमवूडमधील रहिवाशी हरमिश पटेल यांनी  1,058,082 डॉलर सोनं एकत्र केलं. तो त्याच्या कारमधून घरी घेऊन गेला. या जोडप्यानं जानेवारी महिन्यात सुट्टीवर जाण्यापूर्वी पैसे परत मागितले. त्यावेळी नकली अमेरिकन एजन्सीच्या अधिकाऱ्यानं तुमचा सामाजिक सुरक्षा नंबर रद्द करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर या जोडप्यानं आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधला. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अखेर त्यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली. 

Advertisement

( नक्की वाचा : धक्कादायक! एकाच पद्धतीनं झाल्या 9 महिलांच्या हत्या, मारेकरी मोकाट! सीरिअल किलरची सर्वत्र दहशत )
 

या तक्रारीनंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. आपण चीनमधील एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर काम करत होतो, अशी माहिती सननं चौकशीमध्ये दिली आहे. पटेलच्या चॅटमधूनही त्याला एक व्यक्ती निर्देश करत असल्याचं स्पष्ट झालंय. त्या व्यक्तीचं नाव 'बेस्ट फ्रेंड' म्हणून पटेलच्या चॅटमध्ये सेव्ह आहे. पटेल आणि सन दोघंही एकाच गटासोबत काम करत असल्याचं तपासात स्पष्ट झालंय. 
 

Topics mentioned in this article