जाहिरात

Crime News : गुटख्यासाठी नवऱ्याने पैसे दिले नाही, बायकोने मुलांसह विष प्यायले; तिघांचा मृत्यू

ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर व्यसनाधीनतेमुळे समाज किती पोखरला गेला आहे, याचे उदाहरण दाखवून देणारी ही धक्कादायक घटना आहे.

Crime News : गुटख्यासाठी नवऱ्याने पैसे दिले नाही, बायकोने मुलांसह विष प्यायले; तिघांचा मृत्यू

Crime News : उत्तर प्रदेशातील इटमा डुडैला गावात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. पती-पत्नीमधील (Husband-wife dispute) गुटख्याच्या पैशांवरून झालेल्या वादानंतर, एका महिलेने आपल्या 3 लहान मुलांना विष पाजून स्वतःही विष (Mother Killed child) प्राशन केले. या दुर्घटनेत आईसह तिच्या 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. गुटख्यासारख्या क्षुल्लक व्यसनापायी एका मातेने आपल्या पोटच्या 3 मुलांचा बळी घेतला आणि स्वतःही आत्महत्या केली. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर व्यसनाधीनतेमुळे समाज किती पोखरला गेला आहे, याचे उदाहरण दाखवून देणारी ही धक्कादायक घटना आहे. पती-पत्नीमधील एका किरकोळ वादाने इतके भीषण रूप घेतले की 3 निष्पाप जीवांना प्राण गमवावे लागले.

हा प्रकार उत्तर प्रदेशच्या मारकुंडी क्षेत्रातील इटवां डुडैला गावात राहणाऱ्या बब्बू यादव यांच्या कुटुंबात घडला आहे. बब्बू यादव हा चालक म्हणून काम करतो. त्याची पत्नी ज्योती यादव (26 वर्ष) हिला गुटख्याचे व्यसन जडले होते. हे व्यसन पराकोटीचे असल्याने गुटखा खाल्ल्याशिवाय तिला चैन पडत नव्हते. सतत गुटख्यासाठी ती नवऱ्याकडे पैसे मागत होती.  शनिवारी सकाळी गुटख्यासाठी पैसे न दिल्याने बब्बू आणि त्याची बायको ज्योती यांच्यात वाद झाला होता.  बब्बूने, ज्योतीला गुटख्याचे व्यसन सोड असे सांगितले होते. ज्योती हट्टाला पेटल्याचे पाहून बब्बूने म्हटले की किमान मुलांसाठी तरी हे व्यसन सोड. बायकोने गुटखा खाऊ नये यासाठी बब्बूने ज्योतीला पैसे देण्यास नकार दिला, यामुळे ज्योती संतापली होती. 

वडिलांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली होती....; जळत्या बहिणीचा व्हिडिओ करणाऱ्या कंचनचा मोठा खुलासा

नक्की वाचा - वडिलांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली होती....; जळत्या बहिणीचा व्हिडिओ करणाऱ्या कंचनचा मोठा खुलासा

बब्बू कामावरून घरी परतल्यानंतर त्याला धक्काच बसला. त्याचा एक मुलगा पोट धरून जमिनीवर तळमळत पडला होता, तर 4 वर्षांची चिमुरडी 'आईने काहीतरी कडू खायला घातले' असे सांगत रडत होती. बब्बूची बायको ज्योतीही वेदनेने तडफडत होती आणि त्यांच्या 1 वर्षांच्या मुलीचे प्राण आधीच गेले होते.  बब्बूने सगळ्यांना मझगवां रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी 1 वर्षांच्या बुलबुलला मृत घोषित केले, तर ज्योती आणि इतर दोन मुलांना सतना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान ज्योती यादव आणि तिचा 4 वर्षांचा मुलगा चंद्रमा यांचाही मृत्यू झाला. 5 वर्षांच्या दीपचंद यादवची प्रकृती अजूनही गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पतीने पोलिसांना सांगितले की, पत्नी गुटख्याची इतकी व्यसनी झाली होती की ती टॉयलेटला देखील गुटख्याशिवाय जात नव्हती. त्याने मुलांच्या भविष्याचा विचार करून तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने हे पाऊल उचलले. बब्बूने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले की ज्योतीने त्याला धमकी दिली होती की जर तू मला गुटख्यासाठी पैसे दिले नाहीस तर याद राख, तुला बघून घेईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com