Gwalior Ring Theft Case: मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये ज्वेलरी शॉपमध्ये चोरीची घटना घडल्याचं समोर आलं आहे. चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून शॉपमधील कर्मचारीच निघाला आहे. शेअर बाजारात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्याने शॉपममध्ये चोरी केली. त्याने शॉपमध्ये बनावट अंगठी ठेवली आणि खरी अंगठी चोरली. ही घटना पडावप पोलीस स्टेशन हद्दीतील ब्लू स्टोन ज्वेलरी शोरूममध्ये घडली. ऑडिट केल्यामुळे चोरीच्या घटनेचा पर्दाफाश झाला. त्यानंतर सीसीटीव्ही तपासण्यात आले. पोलिसांनी चोरट्याला दिल्लीहून अटक केली आहे.
पडाव पोलीस स्टेशन हद्दीतील ब्लू स्टोन ज्वेरली शॉपचा कर्मचारी अवधेश शर्माच चोरटा निघाला. त्याने 17 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरी केली त्या अंगठीच्या जागेवर बनावट अंगठी ठेवली. चोरी केल्यानंतर तो नोकरी सोडून दिल्लीला पळाला. त्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी आरोपीला अटक केली.
नक्की वाचा >> Ashok Kharat : खरातचे व्हिडीओ नक्की कोण व्हायरल करतोय? कोणा कोणाचा आहे समावेश? प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण
शेअर मार्केटमध्ये झालं होतं 10 लाखांचं नुकसान
आरोपी अवधेशने तपासादरम्यान सांगितलं की, शेअर बाजारात त्याने गुंतवणूक केली होती. नुकतच शेअर मार्केटमध्ये त्याचा 10 लाख रुपयांचं नुकसान झालं होतं. याच्या भरपाईसाठी त्याने हे पाऊल उचललं होतं.
नक्की वाचा >>महाराष्ट्राला लागले आषाढीचे वेध, 'या' तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान, वाचा संपूर्ण वेळापत्रक
आरोपीला दिल्लीतून केली अटक
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी अवदेशन 5 मार्च रोजी 17 ग्रॅमची नकली अंगठी घालून ड्युटीवर आला होता. हाताला रुमाल बांधून खरी अंगठी बदलली. 17 मार्च रोजी ऑडिट दरम्यान, नकली अंगठीचं प्रकरण उजेडात आलं. तेव्हा शॉपचे सीसीटीव्ही व्हिडीओ तपासण्यात आले. ज्यामध्ये तो चोरी करत असल्याचं कॅमेरात कैद झालं होतं. पोलिसांनी आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून अंगठी जप्त केली आहे.