जाहिरात

विवाहित महिलेकडून सासूला बेदम मारहाण, नवऱ्याला सोडलं नाही, Video पाहून अंगावर येईल काटा

देशातील वेगवेगळ्या शहरांमधून नवरा, बायको आणि कुटुंबातील नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना उघड झाल्या आहेत. याच प्रकारचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विवाहित महिलेकडून सासूला बेदम मारहाण, नवऱ्याला सोडलं नाही, Video पाहून अंगावर येईल काटा
मुंबई:

देशातील वेगवेगळ्या शहरांमधून नवरा, बायको आणि कुटुंबातील नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना उघड झाल्या आहेत. याच प्रकारचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये विवाहित महिला तिच्या सासूचे केस पकडून त्यांना बेदम मारहाण करत आहे. या महिलेच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या नवऱ्याला देखील सोडलं नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील ग्वाह्लेरमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. यामध्ये आरोपी सून तिच्या सासूचे केस पकडून त्यांना ओढत आणि मारत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी सुनेच्या माहेरची मंडळी तिच्या नवऱ्याला देखील मारहाण करत आहेत.

पत्नी पीडित नवरा आणि सासूनं पोलिसांकडं मदतीची याचना केली आहे. मेरठमधील घटनेप्रमाणे माझी बायको माझ्या म्हाताऱ्या सासूला मारु शकते, अशी भीती तिच्या नवऱ्यानं पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. हे सर्व ती संपत्तीचा ताबा मिळवण्यासाठी करत आहे, असा आरोप त्यानं केला आहे.  

( नक्की वाचा : नणंदेचं 'ते' प्रकरण उघड केलं म्हणून नवरा संतापला, बायकोच्या भुवयांवरून ट्रिमर फिरवला आणि...)

विशाल बात्रा असं या पीडित नवऱ्याचं नाव आहे. त्याचं कारचे स्पेअर पार्ट बनवण्याचं दुकान आहे. ग्वाह्लेरमधील आदर्श कॉलनीमधील त्यांच्या घराची किंमत 2-3 कोटीच्या जवळ असेल असं मानलं जात आहे.  या घरात विशाल त्याची आई सरला बत्रा, बायको आणि दोन मुलांसह राहतात.

विशालनं केलेल्या दाव्यानुसार सकाळी-सकाळी तिच्या माहेरची मंडळी आले आणि त्यांनी मारहाण सुरु केली. सर्वात प्रथम सासऱ्यांनी हात उचलला. आम्ही विरोध केला तर त्यांनी मारहाण सुरु केली. विशालच्या आई सरला मुलाला वाचवण्यासाठी आल्या तर त्यांची सून बाहेर आली आणि तिने सासूला मारहाण सुरु केली. हे सर्व जण मारहाण करत रस्त्यावर आले. त्यांनी तिथंही जोरदार मारहाण केली. आरोपी सून सासूला मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेजाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. 


विशालनं दिलेल्या माहितीनुसार ही संपूर्ण घटना 1 एप्रिलची आहे. त्याच दिवशी घरामध्ये वाद झाला. त्यानंतर 2 एप्रिल रोजी विशाल पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी त्यांची सर्व कैफियत मांडली आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणातील आरोपी पत्नीची बाजू अद्याप समजू शकलेली नाही.

विशालनं केलेल्या दाव्यानुसार या प्रकरणात पुरुष पीडित असल्यानं पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली. मोठ्या प्रयत्नानंतर एफआयआर दाखल करण्यात आली. पण, पोलिसांनी किरकोळ कलमं लावली आहेत. माझ्या आणि आईच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी केला. पत्नीनं घरावर कब्जा केला असून आपण दारोदारी वणवण करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. 

विशालनं शुक्रवारी (4 एप्रिल) पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात जाऊन कठोर कारवाईची मागणी केलीय. त्यावर डीएसपी रॉबिन जैन यांनी कठोर कारवाईचं आश्वासन त्यांना दिलंय. या प्रकरणातील आरोपी पत्नीची बाजू अद्याप समजू शकलेली नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: