Kalyan News : घरात पाळणा हलत नसेल तर अनेक दाम्पत्य मूल दत्तक घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र या दत्तक मुलीसोबत अत्यंत क्रूर वागणूक दिल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. मात्र हा व्हिडिओ इतका भयंकर आहे की तो व्हिडिओ दाखविता येऊ शकत नाही. कल्याणनजीक बापगाव परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
३ वर्षांच्या चिमुरडीच्या डोळ्यात तिखट घातलं...
कल्याणमधील बापगाव परिसरातील झन्कार मोहल्ल्याची ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याने एक मूल दत्तक घेतलं होतं. तरुणाच्या मित्राची पत्नी वारल्याने त्यांच्या मुलीचा तू सांभाळ करशील का असं मित्राने विचारलं होतं. यानंतर दाम्पत्याने या मुलीला दत्तक घेतलं होतं. महिलेने अत्यंत शुल्लक कारणावरून या मुलीला महिलेने मारहाण केली. शेजारी राहणाऱ्या महिलेला चिमुरडीने 'मम्मा' म्हटल्याचा राग आल्याने या महिलेने मुलीला मारहाण केल्याचे कळते आहे. महिला इथवर थांबली नाही. तिने चिमुरडीच्या डोळ्यात तिखट टाकलं आणि तिच्या तोंडातही घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कारवाई केल्याची माहिती आहे. या महिलेचं नाव दिलशाद शेख असल्याचं समोर आलं आहे.
नक्की वाचा - Kalyan News: कल्याण हादरलं! बेपत्ता बहिणींच्या प्रकरणाला वेगळं वळण; आई-वडिलांनी...
चिमुरडीला बेदम मारहाण...
३ वर्षांच्या चिमुरडीला अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली. ही महिला अत्यंत निर्दयीपणे चिमुरडीच्या थोबडवीत होती. बराच वेळ ती मुलीला मारहाण करीत होती. चिमुरडी धायमोकलून रडत होती. मात्र तरीही महिलेला तिची दया आली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world