Prashant Koratkar : मुंबई उच्च न्यायालयात आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्जाविरोधात सुनावणी होणार आहे. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या अपीलावर ही सुनावणी असेल. सकाळच्या सत्रात ही सुनावणी होईल. या सुनावणीसाठी प्रशांत कोरटकर यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुनावणीत त्यांचा जामीन रद्द होणार की नाही हे समजेल.
नक्की वाचा - Pune Crime: अभिनेत्रीसमोर अश्लील चाळे, व्हिडीओ काढला, इंजिनिअर तरुण बाराच्या भावात गेला
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याप्रकरणी आणि शिवाजी महाराजांविरोधात अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर अनेकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून आज उच्च न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जाविरोधात सुनावणी होणार आहे.