
पुण्यात सध्या चाललंय तरी काय असं बोलावं लागेल. गौरव आहुजा याचं प्रकरण ताजं असताना, तसचं एक प्रकरण आता समोर आलं आहे. एसटी बसमध्ये प्रवास करताना एका इंजिनिअर तरुणाने अश्लील चाळे केले आहेत. या बसमधून एक अभिनेत्री ही प्रवास करत होती. तिच्या समोर त्याने हे कृत्य केले. पण याच अभिनेत्रीने त्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये बनवला. तो व्हिडीओ तिने पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवाली केला. शिवाय तक्रार ही दाखल केली. या घटनेनं पोलिसदलही हादरून गेलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यात सध्या चाललंय तरी काय?असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. एका पाठोपाठ एक अश्लील घटनांची जणू मालिकाच सुरू आहे. गौरव आहुजाने केलेल्या अश्लील कृत्याची घटना ताजी असतानाच आता एसटीच्या बसमध्ये सर्वां समोर एका तरुणाने अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. ही बस पुणे सातारा होती. या बसमधून एक तरूण प्रवास करत होता. शिरवळ येथील 41 वर्षीय कमलेश शिरसाठ असं त्याचं नाव आहे.
तो बुधवारी रात्री पुणे सातारा बसमध्ये प्रवास करत होता. त्यावेळी त्याने अश्लील कृत्य केलं. त्याच बसमध्ये बसलेल्या एका अभिनेत्री समोर हा सर्व प्रकार सुरू होता. या अभिनेत्रीने ह्याचे चित्रण आपल्या मोबाईल मध्ये केले. त्यानंतर याविषयीची तक्रार पुणे ग्रामीण पोलिसांकडे केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जवळ जवळ 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजेस चेक केले. त्या नंतर हा व्यक्ती कमलेश शिरसाठ असल्याचं समजले.
शिवाय तो शिरवळ इथला राहाणारा असून तो इंजिनिअर असल्याचे समोर आले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी एका खाजगी कंपनीत अभियंता आहे. अशा उच्चशिक्षित माणसांकडून होणाऱ्या अशा कृत्यांमुळे समाजात असलेल्या विकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. आता या कमलेश शिरसाठवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुणे शहर आणि राज्यात वेगवेगळ्या घटना समोर येत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा गंभीर बनत चालला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world