Hingoli News: दिवाळी निमित्त ऑनलाइन शॉपिंग द्वारे मागवला वॉटर डिस्पेन्सर, मिळाला मात्र कचरा, पुढे काय घडलं?

खबरदारी म्हणून राजू कांबळे यांनी या वस्तूची पॅकिंग उघडत असतानाच छायाचित्रण देखील केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
हिंगोली:

समाधान कांबळे  

दिवाळी निमित्त सर्वच जण खरेदी करण्यावर जोर देत आहेत. अनेक ठिकाणी डिस्काऊंटही दिली जात आहे. नवनव्या ऑफरची खैरात होत आहे. त्यामुळे काही जण थेट बाजारात जावून तर काही जण ऑनलाईन शॉपिंग करत आहेत. बाजारात खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असला तरी तेवढेच लोक ऑनलाईन शॉपिंगला पसंती देत आहेत. पण त्यात त्यांची फसवणूक होण्याची संधी जास्त आहेत. अशी प्रकरणं आता समोर येत आहेत. असचं एक प्रकरण हिंगोली जिल्ह्यात समोर आलं आहे. एकाने मागवली एक वस्तू आणि पॅकिंगमध्ये आली भलतीच वस्तू. त्यामुळे ग्राहकाची तर फसवणूक झालीच पण त्याला नको तो मनस्ताप सहन करावा लागला. 

सण असल्यामुळे अनेक जण ऑनलाईन ॲपवर डिस्काउंट मिळत असल्याने शॉपिंग करण्यास पसंती देत आहेत. मात्र हिंगोलीत ऑनलाइन शॉपिंग करणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडलं आहे. कळमनुरी शहरातील राजू कांबळे या युवकाने ॲमेझॉन  मोबाईल ॲप द्वारे वॉटर डीस्पेंसेर  मागवला होता. ॲमेझॉन ॲप वरून दिलेल्या ऑर्डर नुसार आज त्यांना एका कंपनीचा वॉटर डिस्पेन्सर असल्याचा बॉक्स मिळाला. आपण मागवलेली वस्तू घरपोच आल्याने त्यांनाही आनंद झाला. त्यांनी ती पॅक बॉक्समधील वस्तू स्विकाली.  

नक्की वाचा - Raigad News: अनैतिक संबंध, खोटं इंस्टाग्राम अकाऊंट अन् खून! हादरवून टाकणारा तरुण विवाहितेचा खतरनाक प्लॅन

शिवाय या वॉटर डिस्पेन्सरचे दहा हजार पाचशे रुपयांचं पेमेंट सुद्धा केले. पेमेंट केल्यानंतर आलेल्या बॉक्सचं पॅकींग त्यांनी खोललं. पॅकींग खोलल्यानंतर  राजू कांबळे यांना चांगला धक्का बसला. कारण या वॉटर डिस्पेन्सर ऐवजी या बॉक्समध्ये चक्क प्लायवूडचे तुकडे, बंद पडलेला स्पीकर, त्याचबरोबर कचरा आढळून आला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. राजू कांबळे यांनी तातडीने पार्सल देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्याला त्या बॉक्समध्ये वॉटर डिस्पेन्सर नाही तर कचरा असल्याचं सांगितलं.  

नक्की वाचा - Viral VIDEO: टॉयलेटमधून निघाल्या दारूच्या बाटल्या, बघता बघता बाटल्यांचा खच, पाहा VIDEO

खबरदारी म्हणून राजू कांबळे यांनी या वस्तूची पॅकिंग उघडत असतानाच छायाचित्रण देखील केलं होतं. दरम्यान आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राजू कांबळे यांनी तातडीने कळमनुरी पोलिसांना या संदर्भातली माहिती सुद्धा दिली आहे. तर नागरिकांनी ऑनलाईन  खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. त्याचबरोबर शहानिशा करून ऑनलाइन साहित्य खरेदी करावं असा आवाहन देखील केलं आहे. त्यात आता कांबळेंना त्यांनी खरेदी केलेली मुळ वस्तू मिळणार की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहीला आहे. 

Advertisement