Honey Trap Case : सोशल मीडियाच्या या युगाचे फायदे अनेक आहेत. त्याचबरोबर इथं वावरताना धोका देखील तितकाच आहे. सोशल मीडियातील जाहिरातींना, खोट्या ओळखींना भुलून लाखो रुपये गमावल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याचबरोबर देशविरोधी शक्ती 'हनी ट्रॅप' (Honey Trap) साठी सोशल मीडियाचा वापर करत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI ला संवेदनशील माहिती दिल्याच्या प्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय. त्याच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकानं फिरोजाबादमधील आयुध कारखान्यात (ordnance factory) काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केलीय. तो भारतविरोधी कामांसाठी कुप्रसिद्ध असलेली पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI साठी हेरगिरी करत होता, असा संशय आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार रविंद्र कुमार असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर काही संवेदनशील माहिती ISI ला पुरवल्याचा आरोप आहे. रविंद्र कुमारनं गंगायान अंतराळ प्रकल्प लष्करी लॉजिस्टिक-डिलिव्हरी ड्रोनच्या चाचणीसह गोपनीय डेटा पुरवला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख नीलाब्जा चौधरी यांनी दिली आहे. या प्रकरणात रविंद्र कुमारच्या एका सहकाऱ्याला देखील अटक करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : Mumbai Blast : जावा - जावांच्या भांडणात Yakub Memon कसा फासवर लटकला? वाचा संपूर्ण प्रकरण )
कसा सापडला रविंद्र?
रविंद्र कुमारनं नेहा शर्मा हे कोड नेम असलेल्या ISI च्या एका महिला एजंटला हा डाटा पुरवलला असल्याची माहिती ATS आणि अन्य तपास यंत्रणांना मिळाली होती, असं चौधरी यांनी सांगितलं. त्यानंतर ATS च्या आग्रा युनिटनं त्याची चौकशी केली. त्यासाठी त्याला ATS मुख्यालयात बोलवण्यात आले होते. यावेळी झालेल्या सविस्तर चौकशीमध्ये आपण अत्यंत संवेदनशील माहिती हँडलर नेहाला पुरवली असल्याची कबुली रविंद्रनं दिली आहे, असं शर्मा यांनी स्पष्ट केले.
'चंदन स्टोर किपर 2' या नावानं हँडलरचा फोन नंबर रविंद्रच्या फोनमध्ये सेव्ह होता. शर्मानं फेसबुकच्या मार्फत रविंद्रशी संपर्क साधला होता. या दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर ते एकमेकांशी व्हॉट्सअपच्या संपर्कात होते, अशी माहिती चौधरी यांनी दिली.
( नक्की वाचा : Baloch Liberation Army : बलोच लिबरेशन आर्मी काय आहे? त्यांचं पाकिस्तान सरकारशी वैर का? )
ISI चं हनी ट्रॅपचं मॉडेल जुनंच आहे. यामध्ये महिला एजंट पुरुषांना त्यांच्या जाळ्यात अडकवतात. त्यानंतर त्यांच्याकडून संवेदनशील माहिती हस्तगत केली जाते. रविंद्रनं आयुध कारखान्यातील संवेदनशील माहिती देखील अनेकदा नेहाला दिली होती, असंही चौधरी यांनी सांगितलं.
या प्रकारच्या घटना राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोक आहेत. सर्व महत्त्वपूर्ण संस्थांनी आपली सुरक्षा प्रक्रिया (SOS) अपडेट करावी. त्याचबरोबर संवेदनशील संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेची नियमित तपासणी करावी. त्यानंतरच या प्रकारच्या घटना रोखता येतील, असं चौधरी यांनी सांगितलं. ATS या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. अन्य संदिग्ध व्यक्तींचा शोध सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.