हा कसला बाप! 18 वर्षांच्या मुलीला घेऊन पळाला, पत्नीनं रोखलं तर मारला चाकू, 5 वर्षांपूर्वीही केलं होतं कांड

Father Abducts His Own 18-Year-Old Daughter : एका बापाने आपल्याच पोटच्या मुलीसोबत जे कृत्य केले आहे, ते ऐकून कोणाचेही काळीज थरथरेल.

जाहिरात
Read Time: 3 mins
Crime News : आरोपीच्या पत्नीनं पतीवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई:

Father Abducts His Own 18-Year-Old Daughter : एका बापाने आपल्याच पोटच्या मुलीसोबत जे कृत्य केले आहे, ते ऐकून कोणाचेही काळीज थरथरेल. नात्याला काळिमा फासणारी ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. एका आईनं तिच्या मुलीला वाचवण्यासाठी न्यायासाठी टाहो फोडला आहे. पाच वर्षांपूर्वी जे घडले होते, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील गड पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

ज्या बापाने मुलीचे रक्षण करायला हवे, तोच तिचा कसाई बनल्याचा आरोप होत आहे. समर बहादुर साकेत असे या आरोपी बापाचे नाव असून तो व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर आहे. 

त्याची पत्नी सुनीता साकेत हिने आपल्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. समर बहादुरने याआधी सुद्धा आपल्या एका मुलीला अशाच प्रकारे गायब केले होते, जिचा पत्ता आजही लागलेला नाही. आता त्याने आपल्या 18 वर्षांच्या दुसऱ्या मुलीला सुद्धा पळवून नेले आहे.

( नक्की वाचा : Nashik News: आई-बाबा मला माफ करा! हातावर शेवटचा संदेश लिहून नाशिकमध्ये 21 वर्षांच्या तरुणीनं संपवलं आयुष्य )

धक्कादायक जुना इतिहास

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, समर बहादुरचे हे पहिलेच कृत्य नाही. सुनीताच्या म्हणण्यानुसार, पाच वर्षांपूर्वी तो त्यांच्या एका मुलीला घरातून घेऊन गेला होता. ती मुलगी आजपर्यंत घरी परतलेली नाही. आपला पती आपल्या मुलींना विकत असल्याचा खळबळजनक संशय सुनीताने व्यक्त केला आहे.

Advertisement

पाच वर्षांपूर्वी जेव्हा त्याने मुलीला नेले, तेव्हा परिस्थितीमुळे आणि हतबलतेमुळे सुनीता काही करू शकली नव्हती. मात्र, आता पुन्हा तोच प्रकार घडल्याने तिने न्यायासाठी धाव घेतली आहे.

(नक्की वाचा : Elevator Accident: बाप रे! वरून लिफ्ट धावत होती, खाली मृतदेह चिरडला जात होता; 10 दिवसांनंतर उलगडलं भयानक सत्य )

चाकूने हल्ला आणि मुलीचे अपहरण

ही ताजी घटना 3 जानेवारी रोजी घडली. समर बहादुर आपल्या 18 वर्षांच्या मुलीला घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. यावेळी सुनीताने त्याला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 

Advertisement

मात्र, नराधम बापाने स्वतःच्या पत्नीवरच चाकूने हल्ला केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुनीता आपल्या इतर तीन मुलींना घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने पळाली, तेव्हा कुठे तिचा जीव वाचला.

पोलीस प्रशासनाकडे न्यायाची मागणी

घटनेच्या दिवशी सुनीता गड पोलीस ठाण्यात पोहोचली होती. तिथे दिवसभर बसून राहिल्यानंतर संध्याकाळी तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली. मात्र, अनेक दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप सुनीताने केला आहे.

Advertisement

अखेर हताश होऊन तिने 20 जानेवारी रोजी रीवा येथील पोलीस अधीक्षक आणि आयजी कार्यालयात धाव घेतली आणि तिथे निवेदन देऊन आपली मुलगी शोधून देण्याची विनंती केली. आपल्या दुसऱ्या मुलीची सुद्धा विक्री केली जाण्याची भीती या मातेने व्यक्त केली आहे.
 

Topics mentioned in this article