जाहिरात

Elevator Accident: बाप रे! वरून लिफ्ट धावत होती, खाली मृतदेह चिरडला जात होता; 10 दिवसांनंतर उलगडलं भयानक सत्य

Elevator Accident:   ज्या इमारतीत शेकडो लोक राहतात, जिथे दिवसभर लोकांचा राबता असतो, त्याच इमारतीच्या लिफ्टखाली एक मृतदेह तब्बल 10 दिवसांपासून पडलेला होता.

Elevator Accident:  बाप रे! वरून लिफ्ट धावत होती, खाली मृतदेह चिरडला जात होता; 10 दिवसांनंतर उलगडलं भयानक सत्य
Elevator Accident: 10 दिवस ती लिफ्ट त्या मृतदेहावरून सतत वर-खाली होत राहिली आणि कोणालाही याचा पत्ता लागला नाही.
मुंबई:

Elevator Accident:  एखादी व्यक्ती अचानक घरातून निघते आणि गायब होते. त्यांचं कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारतं, गल्लीबोळांत शोध घेतं, पण ती व्यक्ती कुठेच सापडत नाही. दिवस सरतात, तशी घरच्यांची अस्वस्थता वाढत जाते. पण ज्या व्यक्तीला ते बाहेर शोधत होते, ती व्यक्ती त्यांच्याच घराच्या अगदी जवळ, अतिशय भीषण अवस्थेत होती. 

ही गोष्ट वाचताना तुमच्या अंगावर काटा येईल, कारण ज्या इमारतीत शेकडो लोक राहतात, जिथे दिवसभर लोकांचा राबता असतो, त्याच इमारतीच्या लिफ्टखाली एक मृतदेह तब्बल 10 दिवसांपासून पडलेला होता. विशेष म्हणजे, या 10 दिवसांत ती लिफ्ट त्या मृतदेहावरून सतत वर-खाली होत राहिली आणि कोणालाही याचा पत्ता लागला नाही.

काय आहे प्रकरण?

ही सुन्न करणारी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस गाठणारी घटना मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये  घडली आहे. येथील होशंगाबाद रोडवरील चिनार ड्रीम सिटी या पॉश कॉलनीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

77 वर्षांचे वृद्ध प्रीतम गिरी गोस्वामी हे 6 जानेवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. थोड्या वेळात परत येतो असं सांगून निघालेले प्रीतम गिरी पुन्हा कधीच परतले नाहीत. कुटुंबीयांनी 7 जानेवारीला मिसरोद पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. सीसीटीव्हीमध्ये ते सोसायटीच्या आवारात फिरताना दिसले, पण त्यानंतर ते नेमके कुठे गेले, हे कोणालाच उमजले नाही.

(नक्की वाचा : धक्कादायक! बड्या आयपीएस अधिकाऱ्याचा ऑफिसमधील अश्लील VIDEO VIRAL; राजकारणात मोठी खळबळ )
 

लिफ्ट ठरली मृत्यूचा सापळा

प्रीतम गिरी हे तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर D-304 मध्ये त्यांच्या मुलासोबत राहत होते. 6 जानेवारीला लिफ्टमध्ये काही तांत्रिक बिघाड होता. मिळालेल्या माहितीनुसार, तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट नसतानाही त्याचा दरवाजा उघडाच राहिला होता. 

प्रीतम गिरी यांना याचा अंदाज आला नाही आणि ते थेट शाफ्टमध्ये खाली पडले. त्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, त्यानंतरचे 10 दिवस ती लिफ्ट तशीच सुरू होती. लिफ्ट वापरणारे नागरिक वर-खाली जात राहिले आणि प्रत्येक वेळी लिफ्ट त्या मृतदेहाला चिरडत खाली येत होती.

( नक्की वाचा : ना नदी, ना समुद्र, चक्क इमारतीच्या बेसमेंटमध्ये बुडून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू! वाचा नेमकं काय घडलं? )
 

असा झाला भयानक सत्याचा उलगडा

16 जानेवारी रोजी अचानक लिफ्ट बंद पडली, तेव्हा सोसायटीने तंत्रज्ञाला पाचारण केले. जेव्हा लिफ्टला ग्राऊंड फ्लोअरवरून वर उचलण्यात आले, तेव्हा संपूर्ण इमारतीत असह्य दुर्गंधी पसरली. खाली काय आहे हे पाहिल्यावर उपस्थितांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे एक सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. कपडे आणि चपलांवरून कुटुंबीयांनी प्रीतम गिरी यांची ओळख पटवली. या घटनेने संपूर्ण भोपाळ हादरून गेले आहे. पॉश कॉलनी असूनही सुरक्षेच्या बाबतीत इतका मोठा निष्काळजीपणा कसा झाला, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

बिल्डर आणि सोसायटीवर गंभीर आरोप

मृताचा मुलगा मनोज गिरी यांनी बिल्डर आणि सोसायटी व्यवस्थापनावर संताप व्यक्त केला आहे. तिसऱ्या मजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे अनेक वर्षांपासून बंद आहेत आणि लिफ्टची दुरुस्तीही वेळेवर केली जात नव्हती, असा आरोप त्यांनी केला आहे. 

 पोलिसांनी आणि सोसायटीने वेळीच लिफ्टची तपासणी केली असती, तर वडिलांचा मृतदेह अशा छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला नसता, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, लिफ्ट नसतानाही दरवाजे उघडण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

मिसरोद पोलीस ठाण्याचे प्रभारी रतन सिंह परिहार यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये छातीला गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एसीपी रजनीश कश्यप यांनी सांगितले की, लिफ्टच्या देखभाल-दुरुस्तीसाठी जबाबदार असलेल्या लोकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. जर या प्रकरणात कोणाची निष्काळजीपणा सिद्ध झाला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. भोपाळमधील अशा घटनांनी आता लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com