Siya Goyal Google History Viral : पुण्याच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.आता पोलिसांकडून सियाने रचलेल्या कटाबाबत धक्कादायक माहिती उघड केली जात आहे.पोलिसांच्या माहितीनुसार,केतनच्या हत्येआधी सिया आणि चेतनने सरावही केला होता.सियाने गुगलवर सर्च केलं होतं की,हत्या कशाप्रकारे करायची..याच दरम्यान पुणे पोलिसांच्या टीमने दोन्ही आरोपी चेतन आणि सियाला लोहगडावर नेलं. तिथे दोघांच्या उपस्थितीत पोलिसांनी सीन रिक्रिएट केला.
सिया-चेतनने कसा रचला हत्येचा कट?
केतन अग्रवाल मर्डर केसमध्ये दररोज खळबळजनक माहिती समोर येत आहे.आता पोलिसांचं म्हणणं आहे की,केतनच्या हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि तिचा प्रियकर चेतने हत्येचा सराव केला होता.याशिवाय पुणे पोलिसांचं म्हणणं आहे की,या आरोपींनी केतनला 14 जूनलाही मारण्याचा प्रयत्न केला होता.
सियाने गुगलवर केलं होतं सर्च
केतनच्या हत्येसाठी सियाने गुगलवर हत्येचा अनेक पद्धती सर्च केल्या होत्या. हत्या कशाप्रकारे करता येईल?याबाबत तिने गुगलवर सर्च केलं होतं. पोलिसांचा असाही दावा आहे की,हत्येनंतर तपासा दरम्यान काय काय उत्तर द्यायची आहेत,याचाही आरोपींनी आधीच अभ्यास केला होता.
नक्की वाचा >> Akola News : अकोल्याच्या नव्या बस स्थानकात प्रवाशांमध्ये भीतीचं सावट, गर्दीच्या ठिकाणी महिलेसोबत संतापजनक घटना
चेतनने रुप बदलण्यापर्यंत प्लान केला होता
संशयाची सुई आपल्यावर फिरू नये,यासाठी सिया आणि चेतनने वेश बदलण्याची योजना सुद्धा आखली होती. घटनेनंतर चॅट आणि अन्य डिजिटल पुरावे संपवण्याचाही प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे.पुणे ग्रामीण पोलीस डिजिटल आणि टेक्निकल पुराव्यांच्या आधारावर घटनेचा पुढील तपास करत आहेत.
"जेव्हा मी उठेल तेव्हा केतनला धक्का मार"
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे पोलीस आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला घेऊन लोहगड किल्ल्यावर सीन रिक्रिएट करण्यासाठी पोहोचले. यावरून पोलीस शोध लावतील की,कशाप्रकारे या दोघांनी केतन अग्रवालला दरीत ढकललं? कशाप्रकारे सियाने चेतनला हिंट दिली की, जेव्हा मी उठेल तेव्हा केतनला धक्का मार.चेतन तिकीटशिवाय हुडीमध्ये लोहगडावर कसा पोहोचला? चेतन कशाप्रकारे सिया आणि केतनचा पाठलाग करत होता? असा मोठा तपास लावण्यासाठी पोलिसांनी सिया आणि चेतनला लोहगडावर नेलं होतं.