जाहिरात

Akola News : अकोल्याच्या नव्या बस स्थानकात प्रवाशांमध्ये भीतीचं सावट, गर्दीच्या ठिकाणी महिलेसोबत संतापजनक घटना

अकोला शहरातील मध्यवर्ती नव्या बसस्थानक परिसरात एका महिलेशी कथित छेडछाड आणि गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Akola News : अकोल्याच्या नव्या बस स्थानकात प्रवाशांमध्ये भीतीचं सावट, गर्दीच्या ठिकाणी महिलेसोबत संतापजनक घटना
Akola Woman Molested At Bus Stand

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola Crime News Today : अकोला शहरातील मध्यवर्ती नव्या बसस्थानक परिसरात एका महिलेशी कथित छेडछाड आणि गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.संबंधित महिलेने आरोपीच्या गैरवर्तनाला विरोध केला असता आरोपीने तिला धक्का देऊन खाली पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे उपस्थित प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.बसस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा घटनांवर कठोर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बचावासाठी धावलेल्या व्यक्तीवर हल्ला

घटना घडत असताना महिलेच्या मदतीसाठी एक व्यक्ती तत्काळ पुढे आली.मात्र आरोपीने त्या व्यक्तीवरही हल्ला चढवत मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.या हल्ल्यात संबंधित व्यक्ती जखमी झाली असून तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे.संपूर्ण प्रकार बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती मिळत असून त्याच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

नक्की वाचा >> Sangli News: भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला अपघात, पाच जण जखमी, दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत

पोलिसांची कारवाई सुरू,कठोर शिक्षेची मागणी

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सीसीटीव्ही फुटेज,प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी अधिक प्रभावी पोलीस बंदोबस्त,सीसीटीव्ही यंत्रणेचे काटेकोर निरीक्षण आणि अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे प्रवासी आणि विशेषतः महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोषीवर कठोर कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> Kolhapur News: शिवसेना UBT नेत्याने उडवली खळबळ ! शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com