Crime News : मॉडेलिंगची आवड, पतीने सर्वांसमोर थेट सौंदर्याची खिल्ली उडवली; पत्नीचं टोकाचं पाऊल

ज्या घरात हसण्या-खिदण्याचा आवाज येत होता, त्याच घरात आता शोक पसरला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • लखनऊ में तनु नाम की महिला ने पति राहुल के परिवार के सामने मजाक करने पर आत्महत्या कर ली थी.
  • तनु और राहुल की शादी चार साल पहले हुई थी और उनकी शादी इंटरकास्ट थी.
  • घटना के समय परिवार एक समारोह से लौटकर घर में हंसी-मजाक कर रहा था.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

UP News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे घरातील थट्टा-मस्करी जीवघेणी ठरली आहे. पतीने सर्वांसमोर अपमान केला म्हणून एका महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. ज्या घरात हसण्या-खिदण्याचा आवाज येत होता, त्याच घरात आता शोक पसरला आहे. 

सीतापूरमधील एका कौटुंबिक कार्यक्रमातून परतल्यानंतर तनुच्या घरातील वातावरण आनंदाने भरलेलं होतं. सर्वजण हसत आणि विनोद करत होते. यातच तनुचा पती राहुलने पत्नीची थट्टा-मस्करी सुरू केली. यानंतर रागावलेली तनु तिच्या खोलीत तणतणत निघून गेली. बराच वेळ ती बाहेर आली नाही. त्यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीतरी गडबड असल्याची भीती वाटली. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजा आतून बंद होता.

नक्की वाचा - पुण्यात मैत्रीचा रक्तरंजित खेळ; मित्राची हत्या करुन मृतदेह मुठा नदीत दिला फेकून, भयंकर कारण


चार वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह...

तनुच्या माहेरच्यांनी सांगितलं की, चार वर्षांपूर्वी तनु आणि राहुलचं लग्न झालं होतं. दोघांनी आंतरजातीय लग्न केलं होतं. एका कॉमन मित्राच्या माध्यमातून दोघांची भेट झाली. ज्यानंतर ही भेट मैत्री आणि त्यानंतर प्रेमात बदलली. यानंतर दोघांनी लग्न केलं. 

तनुची बहीण अंजलीने सांगितलं की, तनुला मॉडेलिंगची आवड होती. तनु ही पती आणि सासरच्या मंडळींसोबत बाहेर सीतापूरला एका कार्यक्रमात गेली होती. घरी परतल्यानंतर सर्वजण गप्पा मारत बसले होते. यादरम्यान मजा-मस्ती सुरू होती. यावेळी राहुलने थट्टा-मस्करीत आपल्या पत्नीला 'माकडीण म्हटलं. यानंतर तनु उठली आणि आपल्या खोलीत निघून गेली. सर्वांना वाटलं तिचा राग उतरला की ती परत येईल. मात्र बराच वेळ काहीच हालचाल दिसली नाही. त्यावेळी सासरच्यांना संशय ढाला. त्यांनी खोलीच दार उघडण्याचा प्रयत्न केला, तर दार आतून बंद होतं. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं तर तनुने गळफास घेतला होता. एनडीटीव्हीने तनुच्या पतीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काहीही बोलण्याच्या परिस्थितीत नाही.

Advertisement


 
 

Topics mentioned in this article