छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे हरियाणा रोहतकमधील तरुणाने आत्महत्या केली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध आणि त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. काय आहे नेमके प्रकरण? वाचा...
नक्की वाचा - Sangli Crime : तुम्ही कलेक्टर झालात का? हुशार मुलीचा सवाल, भडकलेला बाप बनला हैवान!
समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे हरियाणा रोहतकमधील तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणीच्या पत्नीचं पोलीस कर्मचाऱ्यासोबत अफेयर होते. दोघांनी अश्लील कृत्ये आणि डान्स करतानाचा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ पत्नीने तिच्या पतीला पाठवला होता.
त्यानंतर, नैराश्यामुळे पतीने ३ दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने आरोप केला होता की त्याची पत्नी दिव्या आणि तिचा पोलिस बॉयफ्रेंड त्याला त्रास देत होते. पत्नी दिव्या त्याला त्याच्या वडिलांना मारण्यास आणि वडिलोपार्जित जमीन विकण्यास सांगत होती. पोलिस बॉयफ्रेंडला बढतीसाठी पैशांची आवश्यकता आणि त्यासाठी ती पतीला ब्लॅकमेल करत होती.
Mumbai Crime: धावत्या ट्रेनमध्ये डॉक्टर दांपत्याला लुटलं, पतीचा हात तुटला, आरोपी अद्यापही मोकाट
व्हिडिओमध्ये या तरुणाने पोलिसांकडे मागणी केली होती की, त्याची पत्नी आणि बॉयफ्रेंडवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पोलीस कर्मचारी दोन दिवसांपूर्वी पंधरा दिवसांची रजा टाकून गायब झाला आहे. या सर्व प्रकरणात हरियाणा पोलिसांकडून रीतसर तक्रार आल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात आला आहे.