- पतीने पत्नीची हत्या केली.
- हत्या करून पतीने ट्रेनखाली आत्महत्या केली.
- 20 रुपयांवरून वाद झाल्याचा संशय
Wife Murdered For 20 Rupees: छोट्या-छोट्या गोष्टींवरुन लोक हिंसक होऊ लागली आहेत. रागाच्या भरात हाणामारी, हत्या यासारख्या मन हादरवणाऱ्या घटना घडत आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. केवळ 20 रुपयांसाठी दोन जणांचा जीव गेलाय. 24 डिसेंबर 2025 रोजी दुपारी जवळपास 12 वाजता हा प्रकार घडलाय. कस्तुरबा नगरमधील झोपडी क्रमांक 54च्या छतावर एक महिला मृत अवस्थेत पडलीय आणि तिच्या गळ्यावर जखमांचे निशाण आहेत, अशी माहिती देणारा फोन पोलिसांना आला. तसेच महिलेचा पती देखील फरार असल्याचे सांगण्यात आलं. या घटनेमुळे राजधानी नवी दिल्ली हादरलीय.
वडिलांनी मुलाला औषध आणण्यासाठी पाठवलं अन्...
कुलवंत सिंग असे मृत आढळलेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिला मृत अवस्थेत आढळली. ओढणीने गळा दाबल्याचे निशाणही दिसले. मृत महिलेचा मुलगा शिव चरणने पोलिसांना सांगितलं की, तो सिगारेट आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. जवळपास 10 मिनिटांनंतर घरी पोहोचलो तर वडिलांनी त्याला औषधं आणण्यासाठी पाठवलं आणि खोलीमध्ये जाण्यासही रोखले. शंका आल्यामुळे त्याने खोलीच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर वडिलांना त्याला जोरात धक्का दिला आणि घरातून पळ काढला.
पत्नीची हत्या केल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर बसला पती
खोलीत गेल्यानंतर मुलाला आई बिछान्यावर मृत अवस्थेत आढळली आणि तिच्या गळ्यावर ओढणी बांधली होती. क्राइम टीम आणि एफएसएल टीम घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह जीटीबी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेमसाठी पाठवला. यादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मृत महिलेचा पती कुलवंत सिंग रेल्वे ट्रॅकवर बसलाय. पोलीस, शेजारी आणि मुलासह घटनास्थळी पोहोचले पण तोवर कुलवंत सिंगने चालत्या ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली होती. त्याला जीटीबी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जेथे डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले.
(नक्की वाचा: Navi Mumbai: नवी मुंबई हादरली! बालदिनीच 6 वर्षांच्या विद्यार्थ्याचा छळ, शिक्षकानं 5-6 वेळा थोबाडीत मारायला लावलं, अन्...)
20 रुपयांमुळे वाद?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासामध्ये कौटुंबिक वादानंतर आधी हत्या आणि त्यानंतर आत्महत्या झाल्याचे दिसून येतेय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान 20 रुपयांच्या वादातून हे प्रकरण घडल्याचं म्हटलं जातंय.