जाहिरात

Akola News : अकोल्यात लव्ह जिहाद? पत्नीचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, अन्नपूर्णा माता मंदिरासमोर..

अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात सोमवारी सायंकाळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण मोठी खळबळ उडाली.

Akola News : अकोल्यात लव्ह जिहाद? पत्नीचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, अन्नपूर्णा माता मंदिरासमोर..
Akola Love Jihad Crime News

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Crime News Today : अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात सोमवारी सायंकाळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण मोठी खळबळ उडाली. डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अन्नपूर्णा माता मंदिरासमोर 24 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता.मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला महिलेची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला

.महिलेचा खून करून तिची ओळख लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा,असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविना पवार असं मृत महिलेचं नाव असून ती मंगळूरपीर येथील रहिवासी आहे. या प्रकरणी अकोला पोलिसांनी आरोपी पती सादिक शहा तसरीफ शहा (29) याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

रविना पवारने सादिक शहा तसरीफ शहा याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला एक लहान मुलगा असून रविना पवार ही आठ दिवसांची बाळंतीन असल्याचीही माहिती समोर आली आहे. काही कारणास्तव हे दाम्पत्य काही दिवस मुंबईमध्ये राहत होते. त्यानंतर ते अकोल्यात येऊन भाड्याच्या खोलीत राहत असल्याचे समोर आले.

नक्की वाचा >> Ashok Kharat: 'हा' चित्रपट पाहून अशोक खरात बनला 'मास्टरमाईंड', चीड आणणारं भोंदूबाबाचं आणखी एक प्रकरण समोर

दरम्यान,पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे.या वादातूनच सादिक शहाने पत्नी रविना पवारचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यानंतर गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आठ दिवसांचे बाळ चाईल्ड लाईनच्या ताब्यात; कठोर कारवाईची मागणी 

धक्कादायक बाब म्हणजे मृत रविना पवारला अवघ्या आठ दिवसांचे बाळ असल्याची माहिती समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर या नवजात बाळाच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,या आठ दिवसांच्या बाळाला पुढील संगोपनासाठी चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

नक्की वाचा >> Baramati News : बारामतीत मोठ्या घडामोडी! उमेदवारी मागे घेण्यास 1 दिवस बाकी, 6 उमेदवारांनी घेतला मोठा निर्णय

दरम्यान,या प्रकरणामुळे अकोला शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मृतक रविना पवार यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार बजरंग दलाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या अकोला पोलिसांकडून सुरू असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बजरंग दलाने काय म्हटलं?

"मंगळूरपीर तालुक्यातील नांदखेड गावातील एक महिलेचा मृतदेह अन्नपूर्णा माता मंदिराजवळ आढळला. हे एक लव्ह जिहादचं प्रकरण असण्याची शक्यता आहे.एका मुस्लीम व्यक्तीने तिची हत्या केली आहे. तिला फूस लावून वर्षभर अकोल्यात ठेवलं.त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. ज्या प्रकारे त्या महिलेची हत्या करण्यात आली आणि तिला जाळण्यात आलं, यात एका व्यक्तीचा हात नाहीए.यामध्ये कमीत कमी चार ते पाच व्यक्ती असतील.पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की,याप्रकरणी न्याय मिळावं", अशी प्रतिक्रिया अकोल्याच्या बजरंग दलाचे समन्वयक हरीओम पांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com