IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर अंडरवर्ल्डनं लावले 5000 कोटी, वाचा कसा सुरु होता 'खेळ'

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल (Champions Trophy 2025 Final) रविवारी होणार आहे. या मॅचकडं क्रिकेट फॅन्स प्रमाणेच सट्टेबाज आणि अंडरवर्ल्डचीही नजर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल (Champions Trophy 2025 Final) रविवारी होणार आहे. या मॅचकडं क्रिकेट फॅन्स प्रमाणेच सट्टेबाज आणि अंडरवर्ल्डचीही नजर आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं सेमी फायनलच्या मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच बुकींना अटक केलीय. या सट्टेबाजीचं कनेक्शन दिल्ली एनसीआर ते दुबईपर्यंत पसरलं आहे, अशी माहिती त्यांच्या तपासात उघड झालीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दुबईत होणाऱ्या फायनल मॅचवर 5000 कोटीपर्यंतचा सट्टा लावण्यात आला आहे. टीम इंडियाही सट्टेबाजांची आवडती टीम आहे, अशी माहिती सट्टेबाजांवर नजर ठेवणाऱ्या सूत्रांनी दिली आहे. अनेक सट्टेबाजांचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे. जगभरातील मोठे सट्टेबाज मॅचच्या दरम्यान दुबईत एकत्र येतात, असं त्यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : IND vs NZ : विराट, रोहित, नाही तर 'हा' खेळाडू आहे न्यूझीलंडसाठी खतरनाक! बॅट चालली तर ट्रॉफी आपलीच! )
 

काय होती सट्टेबाजांची पद्धत?

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं सट्टेबाजांच्या एका सिंडेकटचा तपास लावलाय. त्यांनी केलेल्या कारवाईमध्ये परवीन कोचर, संजय कुमारसह 5 आरोपींना अटक करण्यात आलं. परवीन कोचर या सिंडिकेटचा मास्टरमाईंड होता. या आरोपींना छापेमारीच्या वेळी लॅपटॉप आणि मोबाईल फोनच्या माध्यमातून लाईव्ह सट्टेबाजी करताना अटक केली. यावेळी घटनास्थळावरुन अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच सट्टेबाजीशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. 

( नक्की वाचा : IND vs NZ : टीम इंडियाला सोपा नाही फायनलचा पेपर, न्यूझीलंडच्या 5 अवघड प्रश्नांवर शोधावं लागेल उत्तर )
 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार परवीन कोचरनं सट्टेबाजी वेबसाईटवरुन मास्टर आयडी खरेदी केला होता. त्यानंतर एक सुपर मास्टर आयडी तयार केला. त्यानं अन्य सट्टेबाजांना सट्टेबाजांचा आयडी विकला होता. प्रत्येक सिंडेकेट देवाण-घेवणीवर 3 टक्के कमीशन घेत होता. ऑफलाईन सट्टेबाजीमध्ये आरोपी फोन कॉलच्या माध्यमातून लाईव्ह सट्टा लावत होते. सट्ट्यातील भावानुसार नोटपॅडवर एन्ट्री केली जात होती. 

Advertisement
Topics mentioned in this article