जाहिरात

IND vs NZ : विराट, रोहित, नाही तर 'हा' खेळाडू आहे न्यूझीलंडसाठी खतरनाक! बॅट चालली तर ट्रॉफी आपलीच!

Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या एका खेळाडूची न्यूझीलंडला एका खेळाडूची सर्वात जास्त धास्ती आहे.

IND vs NZ : विराट, रोहित, नाही तर 'हा' खेळाडू आहे न्यूझीलंडसाठी खतरनाक! बॅट चालली तर ट्रॉफी आपलीच!
IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल दुबईत होत आहे.
मुंबई:

India vs New Zealand, Champions Trophy 2025 Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचं काऊंटडाऊन आता सुरु झालंय. टीम इंडियानं 2002 आणि 2013 साली ही स्पर्धा जिंकली आहे. तर न्यूझीलंडनं 2000 साली स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. आता दोन्हीमधील कोणती टीम विजेतेपद पटकावणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टीम इंडियाचा X फॅक्टर

भारतीय टीममध्ये अनेक मॅच विनर खेळाडूंचा समावेश आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे अनुभवी खेळाडू भारताकडं आहेत. आयसीसी स्पर्धेच्या फायनल स्पर्धेत त्यांच्या इतका खेळण्याचा अनुभव सध्या कुणाकडंच नाही. विराटनं या स्पर्धेत आत्तापर्यंत एक सेंच्युरी झळकावलीय. तसंच सेमी फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाच्या पराभवात निर्णायक वाटा उचललाय. रोहित शर्माची बॅट चालली तर कोणताही बॉलिंग अटॅक कुचकामी ठरु शकतो. 

रोहित आणि विराटप्रमाणेच व्हाईस कॅप्टन शुबमन गिल (Shubman Gill) आणि ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हे धोकादायक बॅटरही भारतीय टीममध्ये आहेत. पण, या सर्वांपेक्षा न्यूझीलंडला एका खेळाडूची धास्ती आहे. तो आहे टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरची भिस्त असलेला मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer).

IND vs NZ : टीम इंडियाला Good News, संपूर्ण देशाला रडवणारा खेळाडू फायनलमधून आऊट?

( नक्की वाचा :  IND vs NZ : टीम इंडियाला Good News, संपूर्ण देशाला रडवणारा खेळाडू फायनलमधून आऊट? )

न्यूझीलंडविरुद्ध खतनाक रेकॉर्ड

श्रेयसचा न्यूझीलंडविरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. श्रेयसची वन-डेमधील एकूण सरासरी 48.2 आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध ती 70.37 इतकी आहे. श्रेयसनं न्यूझीलंडविरुद्धच्या 9 वन-डेमध्ये 563 रन्स केले आहेत. त्यामध्ये 2 सेंच्युरींचा समावेश आहे. श्रेयसच्या वन-डेमधील 5 पैकी 2 सेंच्युरी या न्यूझीलंडविरुद्ध आहेत. 

श्रेयसनं 5 फेब्रुवारी 2020 रोजी हेमिल्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. टीम इंडियानं तो सामना गमावला. पण, श्रेयसनं 103 रन्सची खेळी केली होती. टेस्ट क्रिकेटमध्येही श्रेयसनं न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणातच सेंच्युरी झळकावली होती.

आयसीसी स्पर्धेतही दमदार कामगिरी

आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडची टीम भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरत होती. पण, श्रेयसच्या आगमनानंतर ही परिस्थिती बदलली. श्रेयसनं आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यात 72 च्या सरासरीनं 217 रन्स केले. त्यामध्ये मुंबईत झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये 105 रन्स आणि आठवडाभरापूर्वी दुबईत केलेल्या 79 रन्सचा समावेश आहे.

कोणताही देश, कोणताही फॉर्मेट आणि कोणतीही स्पर्धा असो श्रेयस अय्यरची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी दमदार आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही श्रेयस टीम इंडियासाठी X फॅक्टर असेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: